AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, RCB vs PBKS: नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने, आरसीबीच्या आव्हानाबाबत श्रेयस अय्यर म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 61वा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि उपविजेत्या पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. हा सामना पंजाब किंग्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफमध्ये स्थान मिळावायचं तर हा सामना जिंकणं भाग आहे. अन्यथा प्लेऑफचं गणित चुकेल. 

IPL 2026, RCB vs PBKS: नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने, आरसीबीच्या आव्हानाबाबत श्रेयस अय्यर म्हणाला...
IPL 2026, RCB vs PBKS: नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने, आरसीबीच्या आव्हानाबाबत श्रेयस अय्यर म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: May 17, 2026 | 3:31 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 61व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स आमनेसामने आले आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना जिंकला तर प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरेल. तर पंजाब किंग्सने हा सामना जिंकला तर प्लेऑफच्या आशा जिवंत राहतील. अन्यथा प्लेऑफचं आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण पंजाब किंग्सचे 13 गुण असून चौथ्या स्थानावर आहे आणि प्लेऑफसाठी 16 गुणांचं गणित सुटणं भाग आहे. अशा स्थितीत हा सामना जिंकला तरच ते गणित सुटू शकतं. अन्यथा प्लेऑफच्या आशा कठीण होऊन जातील. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि पंजाब किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपलं मत मांडलं. सलग पाच पराभवानंतर विजय महत्त्वाचा आहे. त्यावर त्याने भाष्य केलं.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही गोलंदाजी करणार आहोत. मी आकडेवारी पाहत नाहीये, सामने कसे रंगत आहेत हे आपण स्पष्टपणे पाहत आहोत. जर आम्ही चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली, तर नाणेफेकीचा काही फरक पडत नाही. कर्णधार म्हणून हा माझा 100 वा सामना आहे हे मला माहीत नव्हतं, पण आम्ही जिंकलो तर मला आनंद होईल. आम्ही उत्कृष्ट गोलंदाजी करत आहोत, पण आम्हाला दबावाचा आनंद घ्यायला हवा. ब्रार आणि लॉकी संघात येत आहेत.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर/कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

Follow Us
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.