IND vs SA T20: दुसऱ्या सामन्यात चमत्कार, सहावा चेंडू खेळताना जितेश शर्मासोबत घडलं असं काही Video
दक्षिण अफ्रिकेने भारताविरूद्धचा दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय संघ फक्त धावांवरपर्यंत मजल मारू शकला. पण या सामन्यात एक आश्चर्यकारक घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

भारत आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजीत सुमार कामगिरी केली. भारताकडून फलंदाजीत तिलक वर्माने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी कामगिरी करता आली नाही. तिलक वर्माने 34 चेंडूत 2 चौकार आणि पाच षटकार मारत 62 धावा केल्या. इतर फलंदाजांना 30 चा आकडाही गाठता आला नाही. दोन फलंदाज शून्यावर, तर तीन फलंदाजांना एकेरी आकड्यावर बाद झाले. दक्षिण अफ्रिकेने 213 धावा केल्या आणि विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं. पण भारताने 19.1 षटकांचा सामना करत 162 धावा केल्या. भारताने हा सामना 51 धावांनी गमावला. हा सामना भारताने गमावला असला तरी एक आश्चर्यकारक घटनेने लक्ष वेधून घेतलं. जितेश शर्मा हा सर्वात लकी फलंदाज ठरला असं म्हणावं लागेल.
लुथो सिपामला टाकत असलेल्या 15व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याची विकेट गेली. त्यानंतर जितेश शर्मा फलंदाजीसाठी आला. त्याने लुथो सिपामलाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि आक्रमक बाणा दाखवला. पण नंतरचे दोन चेंडू निर्धाव गेले. तर शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवला. ओटनील बार्टनचा संघाचं 16वं षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या पहिला चेंडू आणि वैयक्तिक पाचवा खेळताना जितेश शर्माला काही धाव घेता आली नाही. पण जितेश शर्मा वैयक्तिक सहावा चेंडू खेळला आणि एक चमत्कार घडला. ओटनील बार्टनने टाकलेला चेंडूत मारताना चुकला आणि स्टंपला लागला. पण जितेश शर्मा लकी ठरला.
Wait What was that ?🤯 Ball hit the stumps but Jitesh Sharma is still not out !!🤓#INDvsSA #Jiteshsharma pic.twitter.com/C9zHPAuqmA
— PhysicsFanclub (@Physics_Fanclub) December 11, 2025
ओटनील बार्टनचा चेंडू बेल्सला लागला आणि लाईट पेटला. पण ती बेल्स काही पडली नाही. त्यामुळे जितेश शर्मा नाबाद राहिला. कारण आयसीसी नियमानुसार बेल्स पडत तोपर्यंत खेळाडू नाबाद असतो. त्यामुळे त्याच्यासाठी मैदानात चमत्कार घडला असंच म्हणावं लागेल. नाही तर त्याची खेळी फक्त 5 धावांवर संपुष्टात आली असती. पुढे जितेश शर्माने 17 चेंडूंचा सामना केला आणि 27 धावा केल्या. या खेळीत त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. पण त्याला संघाला विजयाच्या वेशीपर्यंत नेता आलं नाही.
