AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे शेवटी चिडला, सरळ बोलला माझ्या विरुद्ध अजेंडा, जळफळाट त्यातूनच हे चाललय, त्याचा कोणावर राग?

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने अखेर त्याच्यावर सुरु असलेल्या टीकेवर मौन सोडलं आहे. अजिंक्य रहाणे आक्रमकपणे त्याच्यावर होत असलेल्या टीकेवर बोलला. अजिंक्य रहाणे शांत स्वभावासाठी ओळखला जातो. पण त्याचं एक वेगळ रुप पहायला मिळालय.

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे शेवटी चिडला, सरळ बोलला माझ्या विरुद्ध अजेंडा, जळफळाट त्यातूनच हे चाललय, त्याचा कोणावर राग?
Ajinkya Rahane Image Credit source: PTI
| Updated on: Apr 03, 2026 | 11:59 AM
Share

आयपीएल 2026 च्या सीजनला सुरुवात झाल्यापासून अजिंक्य रहाणे चर्चेत आहे. अजिंक्य रहाणे चर्चेत येण्यामागचं कारण आहे त्याचा परफॉर्मन्स. म्हणजे तो खूप चांगला खेळतोय असं नाहीय. उलट अपेक्षित कामगिरी त्याच्याकडून होत नाहीय, म्हणून अजिंक्य रहाणेवर अनेक प्रश्न उपस्थित होतायत. रहाणेने टीम इंडियातील आपलं स्थान आधीच गमावलेलं आहे. टी 20 फॉर्मेटमधील त्याच्या उपयुक्ततेबद्दल अनेकांना शंका आहे. आता कोलकाता नाईट रायडर्समधील अजिंक्य रहाणेची भूमिका आणि स्थान यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. मागच्यावर्षी मेगा ऑक्शनमध्ये अजिंक्य रहाणेला कोलकाता नाइट रायडर्सने विकत घेतलं. कर्णधारपदाचे कोलकाताकडे कमी पर्याय होते. म्हणून अजिंक्य रहाणेला कॅप्टन बनवलं. पण चालू सीजनमध्ये अजिंक्यला अजूनपर्यंत लौककीला साजेसी कामगिरी करता आलेली नाहीय.

चहूबाजूंनी सुरु असलेल्या या टीकेवर आता अजिंक्य रहाणे व्यक्त झालाय. त्याने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. टी20 क्रिकेटमधील स्वत:च्या उपयुक्ततेच त्याने समर्थन केलं. अजिंक्य रहाणेला वाटतं की, त्यांच्याविरोधात अजेंडा राबवला जात आहे. 2023 पासूनचा स्ट्राइक रेट आणि त्याच्या खेळाबद्दल जो दृष्टीकोन बनवला जातोय त्यावर अजिंक्य रहाणे बोलला. “जे माझ्या खेळावर शंका घेतायत ते जवळून माझा गेम बघत नाहीयत किंवा त्यांना मला यशस्वी बघायच नाहीय” असं अजिंक्य रहाणे थेट बोलला.

ते माझा खेळ बघत नाहीत

“2023 पासून माझा उत्तम स्ट्राइक रेट आहे असं मला वाटतय. जे माझ्याबद्दल बोलतात ते माझा खेळ बघत नाहीत असं वाटतं किंवा त्याचा माझ्याविरोधात ठराविक अजेंडा असावा. मला खेळताना बघायला त्यांना आवडत नाही” असं अजिंक्य रहाणे प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला. आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. त्यावेळी चेन्नईने ट्रॉफी जिंकली त्यात अजिंक्यचा महत्वाचा रोल होता. त्या सीजनमध्ये 172.49 च्या स्ट्राइक रेटने त्याने 326 धावा केल्या. पण 2024 मध्ये त्याला 2023 सीजनची पुनरावृत्ती करणं जमलं नाही. अजिंक्यला संपूर्ण सीजनमध्ये फक्त 242 धावा करता आल्या.

हे सगळं जळफळाटीतून

अजिंक्य रहाणेला वाटतं की, “कोणी त्याच्या खेळाचा निष्पक्ष आढावा घेत नाहीय. हे सगळं जळफळाटीतून सुरु आहे. मला जेवढं यश मिळालं ते पाहून त्यांचा जळफळाट होत असावा” “मी याची चिंता करत नाही. तुम्हाला माहितीय मी काय करतोय. फक्त एक इनिंग खराब पण माझा हेतू चांगला होता. काहीवेळा तुम्हाला लय सापडत नाही. जे लोक बोलताय कदाचित त्यांना खेळ समजत नाहीय किंवा मी दुसरी इनिंग खेळावी अशी त्यांची इच्छा आहे” असं अजिंक्य म्हणाले.

Follow Us
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.