मेरी कोम सहाव्यांदा विश्वविजेती, जगातील एकमेव बॉक्सर

मेरी कोम सहाव्यांदा विश्वविजेती, जगातील एकमेव बॉक्सर

नवी दिल्ली : भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोमने सहाव्यांदा जागतिक महिला बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. चँपियनशिप स्पर्धेत सहाव्यांदा सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम ही जगातील एकमेव महिला बॉक्सर आहे. 35 वर्षीय मेरी कोमने 48 किलो वजनी गटात हा पराक्रम केला. यावेळी मेरी कोमने यूक्रेनच्या हना ओखोटाला 5-0 ने हरवलं.

हा सामना दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडिअच्या के. डी. जाधव हॉलमध्ये खेळवण्यात आला.

मेरी कोमचं हे महिला बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेतील सहावे सुवर्णपदक आहे. तर तिचं व्यक्तिगत आठवं सुवर्णपदक आहे. या सुवर्णपदकाने मेरीने चँपियनशिप स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

सामन्या जिंकल्यानंतर मेरी कॉम भावूक झाली. यावेळी मेरी कोम म्हणाली, “मला समर्थन देणाऱ्या सर्वांचे, मी मनापासून आभार मानते. तुमच्या आशीर्वाद आणि प्रेरणेमुळे मी इथवर पोहोचली आहे. हा माझ्यासाठी मोठा क्षण आहे.”

या आधी 2006 साली मेरी कोमने आर्यलँडच्या कॅटी टेलरला 60 किलो वजनी गटात पराभूत करत पाचवं सुवर्णपदक जिंकलं होतं. 2006 ते 2016 या दरम्यान मेरीने पाच सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तर मेरीच्या नावावर एक कांस्यपदक देखील आहे.

विशेष म्हणजे, मेरी कोमने चँपियनशिप स्पर्धेत महिला आणि पुरूष या दोन्ही गटात सर्वाधिक सहा सुवर्णपदकांची कमाई केली आहे. तसेच मेरीने सहा सुवर्ण आणि एक रौप्य जिंकून क्यूबाच्या फेलिक्स सेवोन हीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. फेलिक्सने 1986 ते 1999 दरम्यान हा विक्रम केला होता.

दरम्यान, मेरी कोमने तीन सामन्यांच्या राऊंडमध्ये प्रत्येकवेळी निर्विवाद वर्चस्व ठेवलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI