AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरु शिष्य एक साथ, मास्टर ब्लास्टर आणि सिक्सर किंगचा ‘हा’ फोटो पाहिलात का ?

सचिनने (Sachin Tendulkar) इंस्टाग्रामवर युवराजसोबतचा फोटो शेअर केला आहे.

गुरु शिष्य एक साथ, मास्टर ब्लास्टर आणि सिक्सर किंगचा 'हा' फोटो पाहिलात का ?
सचिन तेंडुलकर युवराज सिंह
| Updated on: Feb 02, 2021 | 4:04 PM
Share

मुंबई : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सिक्सर किंग युवराज सिंह (Yuvraj Singh) नेहमीच चर्चेत असतात. टीम इंडियामधील अनेक हिट जोडींपैकी ही एक हीट जोडी आहे. हे दोघेही अनेकदा एकमेकांसोबत मजा मस्करी असतात. दरम्यान सचिनने युवराजसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही गोल्फ खेळताना दिसत आहेत. (master blaster sachin tendulkar share photo on instagram with yuvraj singh)

“क्रिकेटपासून ते गोल्फ पर्यंत आम्ही खूप दुरवरचं अंतर पार केलं आहे युवी”, सचिनने असं या फोटोला कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर युवराजने हृदयस्पर्शी कमेंट केली आहे. “जिथे जिथे गुरु, तिथे तिथे शिष्य”, अशी कमेंट युवराजने केली आहे. या दोघांचा फोटो नेटीझन्सना चांगलाच आवडला आहे. आतापर्यंत या फोटोला इंस्टाग्रामवर 7 लाखांपेक्षा अधिक जणांनी लाईक केलं आहे.

सचिनच्या स्वप्नासाठी युवराजची झुंज

आपल्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकावं, असं सचिनचं स्वप्न होतं. 2011 च्या वर्ल्ड कपचं आयोजन आशियामध्ये करण्यात आलं होतं. सचिनचा हा अखेरचा वर्ल्ड कप होता. यामुळे त्याला विजयी निरोप द्यावा, अशी टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूची इच्छा होती. यासाठी युवराजने खूप मेहनत घेतली. युवराजने या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंगसह बोलिंगनेही दमदार कामगिरी केली.

युवराजची अनेक सामन्यांदरम्यान प्रकृती बिघडली होती. रक्ताची उलटीही झाली. मात्र यानंतरही तो फक्त नि फक्त सचिनच्या स्वप्नासाठीच खेळत होता. युवराजने केलेल्या मेहनतीचं चीज झालं. टीम इंडियाने अखेर 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला. सचिनचं स्वप्न पूर्ण झालं. संपूर्ण स्पर्धेत युवराजने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 362 धावा केल्या. तसेच 15 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी युवराजला ‘प्लेअर ऑफ द टोर्नामेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

गुरु शिष्याचं नातं

हे दोघे दिग्ग्ज खेळाडू एकमेकांचे सहकारी राहिले आहेत. मात्र या दोघांमध्ये गुरु शिष्याचं नातं आहे. युवराज सचिनला आपला गुरु मानतो. सचिनने युवराजला त्याच्या पडत्या काळात अनेकदा मदत केली आहे. तसेच युवराजला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सचिनने अनेकदा त्याला धीर दिला. सचिनने दिलेल्या धीरामुळे युवराजला क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं.

कॅन्सरला पराभूत केल्यानंतर युवराजने साधारणपणे 5 वर्ष टीम इंडियाचं नेतृत्व केलं. यादरम्यान युवराजने 2014 च्या टी 20 वर्ल्ड कप आणि 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला होता. आयसीसीच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये दुर्देवाने टीम इंडियाचा पराभव झाला. यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. युवराजने 10 डिसेंबर 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

संबंधित बातम्या :

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोचच्या भूमिकेत

Yuvraj Singh retired : मैदानात रक्ताची उलटी करुनही वर्ल्डकप जिंकून देणारा ढाण्या वाघ!

(master blaster sachin tendulkar share photo on instagram with yuvraj singh)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.