मयांक अग्रवालचं डेअरिंग, 196 धावांवर षटकार ठोकून द्विशतक झळकावलं!

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालने (Mayank Agarwal double hundred) पुन्हा एकदा झंझावाती खेळी करत द्विशतक ठोकलं.

मयांक अग्रवालचं डेअरिंग, 196 धावांवर षटकार ठोकून द्विशतक झळकावलं!

इंदूर : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालने (Mayank Agarwal double hundred) पुन्हा एकदा झंझावाती खेळी करत द्विशतक ठोकलं. मयांकच्या धडाकेबाज खेळीमुळे (Mayank Agarwal double hundred) भारताने 350 धावांचा टप्पा ओलांडला आहे. कसोटीचा आजचा दुसरा दिवस आहे. मयांक अग्रवालने 303 चेंडूत द्विशतक ठोकलं. 196 धावांवर असताना मयांकने षटकार ठोकून द्विशतकाला गवसणी घातली. मयांकच्या द्विशतकानंतर भारताची धावसंख्या 4 बाद 365 इतकी होती.

मयांक अग्रवालचं हे कसोटीतील दुसरं द्विशतक आहे. यापूर्वी त्याने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्या द्विशत ठोकलं होतं. विशाखापट्टणम कसोटीत त्याने 215 धावा केल्या होत्या. ते त्याचं पहिलंच द्विशतक होतं. अवघ्या आठव्या कसोटीत मयांक अग्रवालने दोन द्विशतक झळकावून आपली चुणूक दाखवून दिली आहे.

या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी अवघ्या 150 धावांत गुंडाळलं. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताने जबरदस्त खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 6 धावांवर बाद झाल्यामुळे भारताची सुरुवात डळमळीत झाली. मात्र चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांनी खेळाची सूत्रं हाती घेऊन बांगलादेशी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. पुजारा 54 धावा करुन माघारी परतला.

दरम्यान, अग्रवालच्या साथीला मग कर्णधार विराट कोहली आला. कोहलीला मोठी धावसंख्या खेळी करता आली नाही. त्याला अबू जायेदने शून्यावर एलबीडब्ल्यू बाद केलं. मग मयांक आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी रचली. रहाणेने 86 धावा केल्या. मयांकने 183 चेंडूत शतक तर 303 चेंडूत द्विशतक झळकावलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *