IPL 2020 Final, MI vs DC Live Updates | ट्रेंट बोल्टची घातक गोलंदाजी, मुंबईची आक्रमक सुरुवात

Akshay Adhav

Akshay Adhav |

Updated on: Nov 10, 2020 | 8:19 PM

मुंबईचा आक्रमक गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने सुरुवातीलाच दिल्लीला दोन मोठे धक्के दिले आहेत.

IPL 2020 Final, MI vs DC Live Updates | ट्रेंट बोल्टची घातक गोलंदाजी, मुंबईची आक्रमक सुरुवात

दुबई :   आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) अंतिम सामना खेळण्यात येत आहे. हा अंतिम सामना (IPL FINAL 2020) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capital) यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून मोठा स्कोर उभा करण्याचं उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय दिल्लीच्या चांगलाच अंगलट आल्याचं चित्र आहे. मुंबईचा आक्रमक गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने सुरुवातीलाच दिल्लीला दोन मोठे धक्के दिले आहेत. त्यामुळे मुंबईची जोरदार सुरुवात झाली आहे. (IPL 2020 Final, MI vs DC Live Updates mi vs dc trent bolt best bowling)

डावाच्या पहिल्याच बॉलवर ट्रेन्ट बोल्टने दिल्लीचा फलंदाज मार्क स्टॉयनिसला विकेट किपर क्विंटन डिकॉककडे झेल देण्यास भाग पाडले. तसंच पहिल्या ओव्हरमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आपले इरादे त्याने स्पष्ट केले. दुसऱ्या ओव्हरमध्ये बुम बुम बुमराहने देखील बोल्टचा कित्ता गिरवला. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजांना फटकेबाजी करण्याटी संधी त्याने दिली नाही.

बोल्टने इनिंगच्या तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. लेग स्टम्पवर टाकलेला बॉल अजिंक्य समजू शकला नाही. त्याचा देखील झेल डिकॉकने टिपला. सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवून बोल्टने दिल्लीला बॅकफूटला ढकललं.

बोल्ट आणि बुमराहनंतर आज फायनलला खेळत असलेल्या जयंत यादवनेही त्याच्या वैयक्तिक पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्लीचा तगडा फलंदाज शिखर धवनचा काटा कााढला. स्विप मारण्याच्या नादात शिखर जयंत यादवकडून क्लिन बोल्ड झाला.

मुंबई दिल्लीला वरचढ

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई आणि दिल्ली आतापर्यंत एकूण 27 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 27 पैकी 15 सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर दिल्लीनेही मुंबईचा 12 वेळा पराभव केला आहे. मुंबईने या मोसमातील साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात दिल्लीचा पराभव केला. तसेच क्वालिफायर 1 सामन्यातही मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबई दिल्लीवर वरचढ राहिली आहे.

मुंबईची अंतिम सामना खेळण्याची सहावी तर दिल्लीची ही पहिलीच वेळ आहे. मुंबई आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 4 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. तर दिल्लीला आयपीएलच्या 13 मोसमात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचण्यास यश आले आहे. मुंबई अनुभवी टीम असली तरी दिल्लीचा मुंबईवर दबाव आणण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबईने या मोसमातील साखळी सामन्यातील 2 आणि क्वालिफायर 1 अशा एकूण 3 सामन्यात दिल्लीचा पराभव केला आहे. त्यामुळे मुंबई दिल्लीवर वरचढ आहे. मात्र तरही या अंतिम सामन्यात कोण कोणावर वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

(IPL 2020 Final, MI vs DC Live Updates mi vs dc trent bolt best bowling)

संबंधित बातम्या

IPL 2020 Final MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची आयपीएल फायनल सामन्यांमधील कामगिरी

IPL FINAL 2020, MI vs DC : अंतिम सामन्याआधी सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सला महत्वाचा सल्ला

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI