MI vs RR, IPL 2021 Match 24 Result | क्विटंन डी कॉकचे अर्धशतक, कृणाल पंड्याची फटकेबाजी, मुंबईचा राजस्थानवर 7 विकेट्सने शानदार विजय

| Updated on: Apr 29, 2021 | 7:19 PM

MI vs RR 2021 Live Score In Marathi | मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे.

MI vs RR, IPL 2021 Match 24 Result | क्विटंन डी कॉकचे अर्धशतक, कृणाल पंड्याची फटकेबाजी, मुंबईचा राजस्थानवर 7 विकेट्सने शानदार विजय
MI vs RR 2021 Live Score In Marathi | मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने

दिल्ली | मुंबई इंडिन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे विजयी आव्हान 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक नाबाद 70 धावा केल्या. तसेच कृणाल पंड्याने 39 धावांची खेळी केली. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (arun jaitley stadium delhi) करण्यात आले होते. (mi vs rr live score ipl 2021 match mumbai indians vs rajasthan royals scorecard online arun jaitley stadium delhi in marathi)

Key Events

क्विंटन डी कॉकची विजयी खेळी

क्विंटन डी कॉक मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. क्विंटन डी कॉकने 50 चेंडूत 140 च्या स्ट्राईक रेटने 6 चौकार आणि 2 सिक्ससह नाबाद 70 धावा केल्या.

मुंबईचा तिसरा विजय

मुंबईने राजस्थानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. यासह मुंबईचा या मोसमातला हा तिसरा विजय ठरला. विशेष म्हणजे मुंबईने या मोसमात पहिल्यांदा विजयी धावांचे पाठलाग करताना हा विजय साकारला. मुंबईच्या सर्व फलंदाजांनी विजयात योगदान दिलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 29 Apr 2021 07:17 PM (IST)

    मुंबईचा 7 विकेट्सने विजय

    मुंबई इंडिन्सने राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे विजयी आव्हान 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक नाबाद 70 धावा केल्या. तसेच कृणाल पंड्याने 39 धावांची खेळी केली. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

  • 29 Apr 2021 06:57 PM (IST)

    पोलार्डचा शानदार सिक्स

    कायरन पोलार्डने सामन्यातील 18 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर 78 मीटर लांबीचा सिक्स लगावला आहे.

  • 29 Apr 2021 06:56 PM (IST)

    मुंबईला तिसरा धक्का

    मुंबईने तिसरी विकेट गमावली आहे.  कृणाल पंड्या आऊट झाला आहे. पंड्याने 26 चेंडूत 2 सिक्स आणि 2 फोरसह 39 धावांची खेळी केली.

  • 29 Apr 2021 06:38 PM (IST)

    मुंबईला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 53 धावांची आवश्यकता

    मुंबई इंडियन्सने 14 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 119 धावा केल्या आहेत. मुंबईला विजयासाठी आणखी 36 चेंडूत 53 धावांची आवश्यकता आहे. मैदानात क्विंटन डी कॉक आणि कृणाल पंड्या खेळत आहेत.

  • 29 Apr 2021 06:27 PM (IST)

    क्विटंन डी कॉकचे शानदार अर्धशतक

    क्विटंन डी कॉकने 35 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावलं आहे. डी कॉकच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 15 वं अर्धशतक ठरलं.

  • 29 Apr 2021 06:16 PM (IST)

    मुंबईला दुसरा झटका

    मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 16 धावा केल्या.

  • 29 Apr 2021 06:14 PM (IST)

    मुंबईचा 9 ओव्हरनंतर स्कोअर

    मुंबई इंडियन्सने 9 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 83 धावा केल्या आहेत. क्विंटन डी कॉक 47 तर सूर्यकुमार यादव 16 धावांवर खेळत आहेत. मुंबईला विजयासाठी 66 चेंडूत 89 धावांची आवश्यकता आहे.

  • 29 Apr 2021 05:53 PM (IST)

    मुंबईला पहिला धक्का

    मुंबईला पावर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर मोठा धक्का बसला आहे. ख्रिस मॉरिसने हिटमॅन रोहित शर्माला 14 धावांवर चेतन साकरियाच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 29 Apr 2021 05:50 PM (IST)

    क्विंटन डी कॉकचा शानदार सिक्स

    क्विंटन डी कॉकने 6 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर 72 मीटरचा सिक्स लगावला आहे.

  • 29 Apr 2021 05:46 PM (IST)

    हिटमॅनचा खणखणीत सिक्स

    हिटमॅन रोहित शर्माने सामन्यातील 7 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर जयदेव उनाडकटच्या बोलिंगवर 74 मीटरचा शानदार सिक्स लगावला आहे.

  • 29 Apr 2021 05:27 PM (IST)

    मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात

    मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विटंन डी कॉक ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. मुंबईला विजयासाठी 172 धावांची आवश्यकता आहे.

  • 29 Apr 2021 05:15 PM (IST)

    मुंबईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान

    राजस्थानने मुंबईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. जोस बटलरने 41 तसेच शिवम दुबेने 35 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वलाने 32 धावांची खेळी केली. मुंबईकडून राहुल चाहरने 2 विकेट्स घेतल्या.

  • 29 Apr 2021 05:04 PM (IST)

    राजस्थानला चौथा धक्का

    जसप्रीत बुमराहने राजस्थानला चौथा धक्का दिला आहे. जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीवर शिवम दुबेला कॅच आऊट केलं आहे. दुबेने 35 धावा केल्या.

  • 29 Apr 2021 04:43 PM (IST)

    राजस्थानचा 15 ओव्हरनंतर स्कोअर

    राजस्थानचा 15 ओव्हरनंतर 2 बाद 126 असा स्कोअर झाला आहे.  कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे मैदानात खेळत आहेत.

  • 29 Apr 2021 04:19 PM (IST)

    राजस्थानला दुसरा झटका

    राहुल चाहरने राजस्थानला दुसरा झटका दिला आहे. राहुलने आपल्या गोलंदाजीवर सलामीवीर यशस्वी जयस्वालला कॉट एन्ड बोल्ड केलं आहे. यशस्वीने 32 धावांची खेळी केली.

  • 29 Apr 2021 04:09 PM (IST)

    राजस्थानला पहिला धक्का

    राहुल चाहरने राजस्थानला पहिला धक्का दिला आहे. चाहरने जोस बटलरला विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हाती स्टंपिग आऊट केलं.

  • 29 Apr 2021 04:02 PM (IST)

    जोस बटलरचा सिक्स, सलामी अर्धशतकी भागीदारी

    जोस बटलरने 7 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर जयंत यादवच्या गोलंदाजीवर  सिक्स लगावला. यासह राजस्थानच्या सलामी जोडीची अर्धशतकी  भागीदारी पूर्ण झाली आहे.

  • 29 Apr 2021 03:57 PM (IST)

    राजस्थानचा पावर प्लेनंतर स्कोअर

    राजस्थानने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हमध्ये बिनबाद 47 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल 20 तर जोस बटलर 26 धावांवर नाबाद खेळत आहे.

  • 29 Apr 2021 03:45 PM (IST)

    राजस्थानची संयमी सुरुवात

    राजस्थानच्या सलामीवीरांनी सयंमी सुरुवात केली आहे.  यशस्वी जयस्वाल आणि  जोस बटलर या सलामी जोडीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये बिनबाद 19 धावा केल्या आहेत.

  • 29 Apr 2021 03:37 PM (IST)

    चौकारासह राजस्थानची धडाक्यात सुरुवात

    सामन्यातील पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर जोस बटलरने शानदार चौकार लगावत धडाक्यात सुरुवात केली आहे.

  • 29 Apr 2021 03:30 PM (IST)

    राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात, जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल मैदानात

    राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे, सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल मैदानात दाखल

  • 29 Apr 2021 03:14 PM (IST)

    मुंबईची पलटण

    रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, नाथन कुल्टर नाइल, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.

  • 29 Apr 2021 03:13 PM (IST)

    राजस्थानची प्लेइंग इलेव्हन

    जोस बटलर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार), शिवम दुबे, राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर, रियान पराग, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन साकरिया आणि मुस्तफिज़ुर रहमान.

  • 29 Apr 2021 03:04 PM (IST)

    मुंबईने टॉस जिंकला

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून  फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान प्रथम फलंदाजी करणार आहे. 

     
     
  • 29 Apr 2021 02:44 PM (IST)

    मुंबई विरुद्ध राजस्थान आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज (29 एप्रिल)  दुहेरी थरार रंगणार आहे. आज 2 सामने खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

Published On - Apr 29,2021 7:17 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.