युवराजचा बोलर म्हणून वापर, ते सलामीसाठी रोहितची निवड, धोनीचे 10 बेमिसाल निर्णय

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर (MS Dhoni 10 Memorable decision)  केली.

युवराजचा बोलर म्हणून वापर, ते सलामीसाठी रोहितची निवड, धोनीचे 10 बेमिसाल निर्णय

मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ  पोस्ट करत धोनीने याबाबची घोषणा केली. (MS Dhoni 10 Memorable decision)

महेंद्रसिंह धोनीचे 10 बेमिसाल निर्णय

1) जोगिंदरकडून शेवटची ओव्हर – 2007 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये जोगिंदर शर्माकडून शेवटची ओव्हर टाकून घेतली, वर्ल्ड कप जिंकला.

2) बॉलआऊटचा बादशाह – 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये लीग मॅच टाय झाला, निर्णय बॉल आऊटवर आला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये सेहवाग, उथप्पा आणि हरभजन सिंहने बोलिंग केली होती. धोनीचा तो निर्णय यशस्वी ठरला होता.

3) धोनीचा विश्वविजयी हेलिकॉप्टर शॉट – 2011 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये कुलशेखराला मारलेला हेलिकॉप्टर शॉट अजरामर झाला. धोनी 91 रनवर नाबाद राहिला आणि 28 वर्षानंतर भारत विश्वविजेता बनला.

4) युवराजचा बॉलर म्हणून वापर – युवराजसिंगला सगळे बॅटसमन म्हणून ओळखतात. पण धोनीनं 2011 वर्ल्डकपमध्ये त्याच्याकडून रेग्युलर बॉलिंग करून घेतली. 9 मॅचमध्ये त्यानं 15 विकेटस् काढल्या. विश्वविजेता बनण्यात योगदान त्याचे महत्त्वाचे योगदान आहे.

5) अश्विन-रैनाचा योग्य वापर– 2011 च्या वर्ल्डकपमध्ये अश्विन आणि रैनाचा वापर धोनीनं सुरुवातीला केला नाही. नॉकआऊट सामन्यात सरप्राईज पॅकेज म्हणून वापर योग्य ठरला.

6) नेहराचा सावध वापर – 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये आशिष नेहरा सुरुवातीच्या सामान्यात फेल झाला. पण धोनीनं त्याला पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाविरूद्ध वापरलं, त्याचं सोनं झालं.

7) युवा खेळाडूंवर विश्वास – 2008 च्या ऑस्ट्रेलिया सिरीजसाठी धोनीनं दिग्गज खेळाडूंना डावलून गंभीर, रोहीत शर्मा, प्रवीणकुमारला निवडलं. पहिल्यांदा ट्राय सिरीज जिंकली.

8) ईशांत शर्माचा वापर – 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफित सर्वाधिक महागडा ईशांत गोलंदाज ठरला. पण इंग्लंड जिंकण्याच्या उंबरठ्यावर असतानाच ईशांतला पुन्हा संधी दिली. त्यानं गेलेली मॅच आणली.

9) रोहित शर्माचं नशीब बदललं – रोहितला ओपनिंगला प्रमोट केलं आणि त्यानंही धडाकेबाज खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली.

10) आयपीएलमध्येही हिट – धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्ज ही सर्वात यशस्वी टीम ठरली. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये तो यशस्वी ठरला. (MS Dhoni 10 Memorable decision)

संबंधित बातम्या : 

MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, आयपीएलमध्ये खेळणार

वय वाढलं, पण फिटनेसबद्दल बोलण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती, धोनीच्या निवृत्तीची कारणे कोणती?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *