रोहितच्या साथीला युवराज, चौथ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज

मुंबई : तीन वेळची आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा नव्या मोसमासाठी सज्ज आहे. सलामीवीर रोहित शर्मासह यावेळी दिग्गजांची फौज मुंबई इंडियन्समध्ये आहे. या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पहिलाच सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रविवारी म्हणजे 24 मार्चला होणार आहे. यावेळी मुंबई इंडियन्समध्ये अष्टपैलू युवराज सिंहचाही समावेश आहे. मुंबईने 2013, 2015 आणि 2017 मध्ये आयपीएल चॅम्पियन होण्याचा …

रोहितच्या साथीला युवराज, चौथ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज

मुंबई : तीन वेळची आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा नव्या मोसमासाठी सज्ज आहे. सलामीवीर रोहित शर्मासह यावेळी दिग्गजांची फौज मुंबई इंडियन्समध्ये आहे. या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पहिलाच सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रविवारी म्हणजे 24 मार्चला होणार आहे. यावेळी मुंबई इंडियन्समध्ये अष्टपैलू युवराज सिंहचाही समावेश आहे.

मुंबईने 2013, 2015 आणि 2017 मध्ये आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबईचा आलेख चढताच आहे. गेल्या मोसमात साखळी सामन्यातून बाहेर होण्याची नामुष्की मुंबईवर ओढावली होती. त्यामुळे चुकांपासून सावध होत यावेळी नव्या जोमाने मैदानात उतरण्यासाठी मुंबई इंडियन्सने तयारी केली असेल यात शंका नाही.

मजबूत फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्या हे दमदार खेळाडू मुंबईत आहेत. फिटनेसमुळे भारतीय संघातून बाहेर असलेल्या हार्दिक पंड्याने आयपीएलमधून पुन्हा फिट होणार आहे. आयपीएलमध्ये सूर्यकुमारची कामगिरीही लाजवाब आहे. त्याने 69 सामन्यांमध्ये 1124 धावा केल्या आहेत. तर रोहितच्या नावावर 173 सामन्यांमध्ये 4493 धावा आहेत. एक शतक आणि 34 अर्धशतकांसह त्याने या धावा कुटल्या आहेत.

जबरदस्त फॉर्मात असलेल्या जसप्रीत बुमराकडे गोलंदाजीचं नेतृत्त्व असेल. वन डेमध्ये जगातला नंबर वन गोलंदाज असलेल्या बुमराच्या साथीला यावेळी अनुभवी खेळाडू लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लंघन, मयंक मार्कंडेय, अडम मिल्ने यांचाही समावेश आहे. युवा गोलंदाज बरिंदन सरन आणि जयंत यादव यांना संधी मिळाल्यास तेही स्वतःला सिद्ध करण्यास उत्सुक असतील.

गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून धमाकेदार खेळी करणारा क्विंटन डी कॉक यावेळी मुंबईकडून खेळणार आहे. संपूर्ण मोसमात तो आयपीएलमध्ये नसेल, कारण 30 मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक सुरु होत असल्याने तो लवकरच मायदेशात परतण्याची शक्यता आहे. डी कॉकने 34 आयपेल सामन्यात आतापर्यंत 130 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने 927 धावा केल्या आहेत. यष्टीरक्षणासाठी युवा ईशान किशनही डी कॉकच्या साथीला असेल.

मुंबईची कमकुवत बाजू काय?

मुंबईमध्ये अशी नावं आहेत, ज्यांची निवड अंतिम अकरा खेळाडूमध्ये करताना संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढणार आहे. बेन कटिंग किंवा केरॉन पोलार्ड यातून कुणाला निवडावं हा प्रश्न असेल. याशिवाय जसप्रीत बुमरावर जास्त भार न टाकणं याकडेही लक्ष द्यावं लागेल. कारण, पुढे विश्वचषक सुरु होत आहे. फिरकीपटू गोलंदाजांची उणीव मुंबई इंडियन्सला भासू शकते.

मुंबई इंडियन्सचे खेळाडू

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक, युवराज सिंह, अनमोलप्रीत सिंह, ईशान किशन, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, बेन कटिंग, केरॉन पोलार्ड, मयंक मार्कंडेय, मिशेल मॅक्लंघगन, जसप्रीत बुमरा, जेसन बेहरेनडोर्फ, राहुल चाहर, पंकज जैस्वाल, सिद्धेश लाड, एविन लुईस, लसिथ मलिंगा, अडम मिल्ने, रसिख सलाम, अनुकूल रॉय, बरिंदर सरन, आदित्य तरे, जयंत यादव

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *