मुथय्या मुरलीधरनची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला (Muttiah Muralitharan) चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुथय्या मुरलीधरनची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
मुथय्या मुरलीधरन

चेन्नई : श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला (Muttiah Muralitharan) चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, हृदयाशी संबंधित काही त्रास होत असल्यामुळे (Cardiac Issue) त्याला चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबादसह (Sunrisers Hyderabad) चेन्नईमध्ये आहे. तो या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. (Muttiah Muralitharan admitted to Apollo Hospital chennai due to heart problems)

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 18 एप्रिल रोजी संध्याकाळी मुरलीधरनला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्या काही टेस्ट करण्यात आल्या. त्यांतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशी माहिती मिळाली आहे की, मुरलीधरनच्या हृदयात ब्लॉकेज आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या हृदयात एक स्टेंट टाकला जाईल. मुरलीधरन 17 एप्रिलला चेन्नई येथे खेळवण्यात आलेल्या हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यावेळी मैदानात उपस्थित होता.

49 वर्षीय मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. तो श्रीलंकेकडून 133 कसोटी आणि 350 एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 800 आणि वनडेमध्ये 534 बळी घेतले आहेत. 2011 च्या विश्वचषकानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आयपीएलमध्येदेखील खेळला आहे.

मुरलीधरन चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स केरला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांचा भाग होता. आयपीएलमध्ये तो 66 सामने खेळला आहे. त्यात त्याने 63 बळी घेतले आहेत. 11 धावा देत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलच्या तीन मोसमात त्याने चेन्नई सुपर किंग्ज या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात त्याने 40 बळी मिळवले आहेत. त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रशिक्षक म्हणून रुजू झाला आहे.

दिग्गज फिरकीपटू

बॉलिंग अ‍ॅक्शनमुळे मुरलीधरनला आपल्या कारकीर्दीत बर्‍याचदा वादाचा सामना करावा लागला आहे. अनेकदा त्याची बॉलिंग अॅक्शन अवैध ठरवण्यात आली, परंतु प्रत्येक वेळी त्याला क्लीन चिट मिळाली. संपूर्ण कारकीर्दीत तो 1711 दिवस कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज राहीला आहे. कसोटी क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक काळ पहिल्या नंबरवर राहण्याचा बहुमान त्याने मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी, सर्वाधिक वेळा एकाच डावात पाच विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे.

संबंधित बातम्या

DC vs PBKS Live Score, IPL 2021 | ‘गब्बर’ शिखर धवनची शानदार खेळी, दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय

10 कोटींची चिअर लीडर म्हणून हिणवलं, त्याच खेळाडूची फटकेबाजी पाहून ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूची पलटी

MI vs SRH IPL 2021 : जिंकल्यानंतरही रोहितच्या मनात या दोन बोलर्सची धास्ती, म्हणतो ‘खेळणं एवढंही सोपं नव्हतं!’

(Muttiah Muralitharan admitted to Apollo Hospital chennai due to heart problems)

Published On - 11:17 pm, Sun, 18 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI