इस्लाम स्वीकारल्याने माझी कामगिरी सुधारली, बड्या क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ

या क्रिकेटपटूने एका मुलाखतीत हे विधान केलं आहे.

इस्लाम स्वीकारल्याने माझी कामगिरी सुधारली, बड्या क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ
युसूफ योहानाने 2005 मध्ये धर्मांतर करत इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर त्याचे नाव मोहम्मद यूसुफ (mohammad yousuf) असे झाले.

इस्लामाबाद : “मी काही वेगळं केलं नाही. 2005 मध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर मी दाढी वाढवली. यानंतर मला फार शांती जाणवली. इस्लाम स्वीकारल्याने माझी कामगिरी बहरली. व्हीव्हीयन रिचर्डसन (Vivian Alexander Richards) यांचा रेकॉर्ड मी मोडीत काढेन असा विचार कधीच केला नव्हता. इस्लाम स्वीकारल्यानंतर मला मानसिक शांती लाभली. त्याचा चांगला परिणाम माझ्या कामगिरीवर झाला. मला कोणीच थांबवू शकणार नाही, तसेच माझ्या वाटेत आड येणार नाही”, असं म्हणत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने 2006 (Mohammad Yousuf) मधील शानदार कामगिरीचं श्रेय हे इस्लाम धर्माला दिलं आहे. युसूफ Wisden वेबसाईटशी संवाद साधत होता. यावेळेस त्याने याबाबतची प्रतिक्रिया दिली. (my brilliant performance in 2006 was a reward from The Almighty after my conversion to Islam said former pakistani crikceter mohammad yousuf)

युसूफने 2005 मध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. मोहम्मद युसूफने (Mohammad Yousuf) 2006 मध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याने लाहोर मध्ये टीम इंडिया विरुद्ध 173 धावांची खेळी केली. यानंतर युसूफने इंग्लंड दौऱ्यावरही धमाकेदार कामगिरी केली. त्याने एका वर्षात सर्वाधिक धावांच्या बाबतीत दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीयन रिचर्डसन यांचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. त्याने या वर्षात सर्वाधिक 1 हजार 788 धावा केल्या होत्या.

धर्मांतराबाबत काय म्हणाला?

युसूफने 2005 मध्ये धर्मांतर केलं होतं. त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. इस्लाम धर्म स्वीकारण्याबाबत यूसुफवर दबाव टाकण्यात आला होता, याबाबतची चर्चा आजही होते. याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, ” काही लोकांनी आरोप केला की माझ्यावर इस्लाम स्वीकारण्याबाबत दबाव होता. मात्र खरंतर माझ्यावर असा कोणताही दबाव नव्हता. सईद अनवर हे माझ्यासाठी फार जवळचे होते. आम्ही दोघे फार जीवलग होतो. आम्ही फार चांगले मित्र होतो. खूप काळ एकत्र खेळलो. सईदसोबत मी खूप वेळ घालवला. त्याचे आई वडील हे मला मुलासारखी वागणूक द्यायचे. त्याच्या घरी फार चांगलं वातावरण होतं. त्यामुळे माझा इस्लामाकडे ओढा वाढला. मी सईदला धार्मिक असण्याआधी आणि त्यानंतर पाहिलं होतं. सईदची धर्माप्रती असलेली निष्ठा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. सईदचा माझ्यावरील प्रभाव हा मी धर्मांतर करण्यासाठीचा टर्निंग पॉईंट ठरला, ” असं युसूफने स्पष्ट केलं.

मोहम्मद यूसुफची कामगिरी

मोहम्म्द युसूफने पाकिस्तानकडून 90 कसोटीमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 52.29 च्या सरासरीने 24 शतक आणि 33 अर्धशतकांसह 7 हजार 530 धावा केल्या होत्या.तर 288 वनडेत 15 शतक आणि 64 अर्धशतकांसह 9 हजार 720 धावा केल्या होत्या.

संबंधित बातम्या :

Rishabh Pant | पंत म्हणजे डावखुरा सेहवाग, रिषभच्या आक्रमक फलंदाजीचा दिग्गज क्रिकेटपटू दिवाना

(my brilliant performance in 2006 was a reward from The Almighty after my conversion to Islam said former pakistani crikceter mohammad yousuf)

Published On - 7:23 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI