AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nz vs Ind, 3rd T20I: सूर्यकुमार यादव या दिग्गज खेळाडूचा मेगा रेकॉर्ड आज मोडणार का?

रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्यात सध्या स्पर्धा होणार आहे.

Nz vs Ind, 3rd T20I: सूर्यकुमार यादव या दिग्गज खेळाडूचा मेगा रेकॉर्ड आज मोडणार का?
Suryakumar-yadavImage Credit source: AFP
| Updated on: Nov 22, 2022 | 12:57 PM
Share

मुंबई : सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागच्या अनेक दिवसांपासून चांगली खेळी करीत आहे. तो सातत्याने धावा करीत असल्यामुळे अनेक रेकॉर्डच्या (Record) नजीक तो पोहोचला आहे. विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) दिग्गज गोलंदाजांची त्याने मैदानात तारांबळ उडविली. त्यामुळे जगभरातील चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे न्यूझिलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये त्याने शतकी पारी खेळली. कमी चेंडूत शतक झळकावल्यानंतर देशभरातील चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं.

सुर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद रिझवान यांच्यात सध्या स्पर्धा सुरु आहे. कारण T20 फॉरमॅटमध्ये दोघांनी अधिक धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 1151 धावा काढल्या आहेत. तर रिझवानने 1315 धावा काढल्या आहेत. कॅलेंडर वर्षात T20 मध्ये सुर्यकुमार रिझवानचा रेकॉर्ड मोडणार का ? दुसरीकडे अधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड सुर्यकुमार यादवच्या नावावर आहे. सध्या तरी सुर्यकुमार यादवच्या आसपास कोणी नाही.

रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्यात सध्या स्पर्धा होणार आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा सद्यातरी अग्रेसर आहे. रोहितने 78 षटकार 2019 मध्ये मारले होते. त्यानंतर 74 षटकार, 2018 मध्ये मारले होते. सूर्यकुमार यादवने या वर्षात 70 षटकार मारले आहेत. त्याला अव्वल होण्यासाठी नऊ षटकारांची आवश्यकता आहे. डिसेंबर महिना संपण्यापुर्वी सुर्यकुमार अजून सामने खेळणार आहे. त्यामुळे तो रोहितचा विक्रम मोडणार अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

भारताचा संभाव्य संघ:

इशान किशन, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

न्यूझीलंडचा संभाव्य संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे , मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.