ख्रिस्तियानो रोनाल्डोच जागतिक फुटबॉलचा बादशाह, आयर्लंडविरुद्ध दोन गोल दागत केला विश्वविक्रम, काय आहे ही ऐतिहासिक कामगिरी?

फुटबॉल जगतातील विक्रमाधीश असणारा पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा एक नवा विक्रम रचला आहे. यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतात सर्व दिग्गजांनाही मागे टाकलं आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच जागतिक फुटबॉलचा बादशाह, आयर्लंडविरुद्ध दोन गोल दागत केला विश्वविक्रम, काय आहे ही ऐतिहासिक कामगिरी?
ख्रिस्तियानो रोनाल्डो
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 11:35 AM

मुंबई : मागील काही दिवसांपासून जागतिक फुटबॉलमध्ये स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचीच (Cristiano Ronaldo) चर्चा दिसून येत आहे. नुकताच त्याने आपला जुना संघ मँचेस्टर युनायटेडमध्ये (manchester united) परतण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यात नुकत्याच झालेल्या पोर्तुगाल विरुद्ध आयर्लंड सामन्यात रोनाल्डोने दोन गोल करत आंतरराष्ट्र्यी  स्तरावर सर्वाधिक गोल करण्याचा मान पटकावला आहे. रोनाल्डोने आयर्लंड संघाविरुद्धच्या सामन्यात निर्णायक असे 89 आणि 110 व्या मिनिटाला दोन गोल करत हा सन्मान मिळवला.

रोनाल्डोने 180 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 111 वा गोल केला. या गोलसोबतच त्याने आयर्लंडच्या चाहत्यांची मनं तोडत पोर्तुगालला विजय मिळवून दिला. पोर्तुगालने हा सामना 2-1 ने जिंकला.  रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करण्याच्या शर्यतीत इरानच्या अली डाएईला मागे सोडलं आहे. अलीने 149 सामन्यात 109 गोल केले होते. दरम्यान रोनाल्डोच्या नावे आता 111 गोल असून त्याला यासाठी 180 सामने वाट पाहावी लागली.

क्लब स्तरावरही रोनाल्डोची हवा

रोनाल्डोने केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच नाही तर चॅम्पियन्स लीगमध्येही सर्वाधिक गोल केले आहेत. चॅम्पियन्स लीगमध्ये त्याच्या नावावर एकूण 134 गोल आहेत. तर युरोपियन लीगमध्येही त्यानेच सर्वाधिक गोल केले असून तिथे त्याने 14 गोल केले आहेत.

युनायटेडमधून झाली होती सुरुवात

रोनाल्डो युव्हेंटसपूर्वी स्पेनच्या दिग्गज क्लब रियल माद्रिदकडून खेळत होता. तो 2009 मध्ये स्पॅनिश क्लबमध्ये पोहोचला आणि 2018 पर्यंत या क्लबमध्ये राहिला. त्याने या क्लबसह ला लीगची विजेतेपदंही पटकावली आहेत. माद्रिदपूर्वी रोनाल्डो इंग्लिश प्रीमियर लीगचा भाग होता. त्याने 2003 मध्ये मँचेस्टर युनायटेडसह त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि तिथूनच त्याला प्रसिद्धी मिळाली, जी पुढे जाऊन त्याने रियल माद्रिदकडून खेळताना अधिक बळकट केली. आता पुन्हा एकदा तो या क्लबसाठी खेळताना दिसणार आहे. 2003 ते  2009 दरम्यान रोनाल्डोने युनायटेड संघासोबत आठ महत्त्वाचे पुरस्कार जिंकले होते. त्याने 291 सामन्यात 118 गोल देखील केले होते.

हे ही वाचा

Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!

दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, Juventus सोडून जुन्या क्लबमध्ये परतला

(Cristiano ronaldo becomes the highest goal scorer at international level after scoring two goals in Ireland vs Portugal match)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.