नंदू नाटेकरांचं भारतीय क्रीडाविश्वात वेगळं स्थान, त्यांचं यश कित्येक खेळाडूंना प्रेरणा देणारं, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण

माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन झालंय. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

नंदू नाटेकरांचं भारतीय क्रीडाविश्वात वेगळं स्थान, त्यांचं यश कित्येक खेळाडूंना प्रेरणा देणारं, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण
माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jul 28, 2021 | 12:34 PM

मुंबई : माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर (Nandu Natekar) यांचं निधन झालंय. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. अर्जुन पुरस्कार विजेते ते पहिलेच खेळाडू होते. (Former indian badminton Player Nandu natekar Dies At 88)

वयाच्या 88  व्या वर्षीत पुण्यात अखेरचा श्वास

आज सकाळी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. त्यांच्या बहारदार खेळाबद्दल त्यांना सहा राष्ट्रीय पदके देखील मिळाली होती. नंदू नाटेकर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली येथे झाला. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच 1953 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.

बॅडमिंटनमधले ‘दिग्गज’

1954 मध्ये त्यांनी ऑल अपघाताने इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. परंतु यानंतर त्यांनी बहारदार खेळाने बॅटमिंनट रसिकांना आनंद दिला. 1980 आणि 1981 मध्ये दुहेरी पदक जिंकलं. 1651 ते 1963 दरम्यान झालेल्या 16 एकेरी सामन्यांपैकी 12 आणि डबल्समध्ये 16 पैकी 8 त्यांनी जिंकले. थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचे सदस्य होते.

नंदू नाटेकरांचं भारतीय क्रीडाविश्वात वेगळं स्थान राहिल. त्यांचं यश कित्येक खेळाडूंना प्रेरणा देणारं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनी ट्विटद्वारे नाटेकरांना श्रद्धांजली वाहिलीय.

नंदू नाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट

हे ही वाचा :

जागतिक क्रिकेटवरील कोरोनाचे संकट गडद, भारत, पाकिस्तानपासून ऑस्ट्रेलियाई क्रिकेटही चिंतेत

Tokyo Olympics 2020: पीव्ही सिंधू, महिला हॉकी संघ उतरणार मैदानात, भारताचे सहाव्या दिवशीचं वेळापत्रक एका क्लिकवर

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें