AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs JAP : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, जपानवर 3-2 ने मात

Hockey Asia Cup 2025 : भारतीय हॉकी संघाने चीननंतर जपानला पराभवाची धुळ चारली आहे. जपानने या सामन्यात काही वेळ दम दाखवला. मात्र भारतासमोर त्यांना शेवटपर्यंत बरोबरी करता आली नाही.

IND vs JAP : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, जपानवर 3-2 ने मात
IND vs JAP HockeyImage Credit source: PTI
| Updated on: Aug 31, 2025 | 9:36 PM
Share

भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशिया कप 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हॉकी आशिया कप स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेत आपला विजयी झंझावात कायम ठेवला आहे. भारताने हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात सलग दुसरा विजय मिळवला आहे. भारताने चीननंतर आता जपानवर मात करत दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने जपानला 3-2 अशा फरकाने नमवलं आहे. भारताने यासह आपली विजयी घोडदौड कायम ठेवलीय. त्यामुळे आता भारताकडे साखळी फेरीतील आपल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कझाकिस्तानवर मात करत विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

हॉकी आशिया कप स्पर्धेतील सर्व सामन्यांचं आयोजन हे बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. भारताने 29 ऑगस्टला चीन  टीमवर मात करत विजयी सलामी दिली. त्यानंतर आज 31 ऑगस्टला जपानला लोळवलं. भारताला जपान विरुद्ध काहीवेळ संघर्ष करावा लागला. जपानने जोरदार झुंज दिली. मात्र भारतानेच मैदान मारलं. टीम इंडियाने यासह ए ग्रुपमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली.

भारताची अप्रतिम सुरुवात

भारताने या सामन्याची अफलातून सुरुवात केली. भारतान पहिल्याच 5 मिनिटांमध्येच 2 गोल ठोकले. भारताने यासह 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. भारतासाठी मंदीप सिंह याने पहिला गोल (चौथ्या मिनिटाला) करत भारताचं खातं उघडलं. त्यानंतर दुसऱ्याच अर्थात पाचव्या मिनिटाला कॅप्टन हरमनप्रीतने गोल केला आणि भारताची आघाडी आणखी मजबूत केली. भारताने पहिल्या सत्रापर्यंत 2-0 अशा फरकाने आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवलं.

जपानने खातं उघडलं

जपानने दुसऱ्या सत्रात 38 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर हरमनप्रीतने पेन्लटी कॉर्नरद्वारे भारतासाठी एकूण तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. भारताने यासह पुन्हा 2 गोलने आघाडी मिळवली. जपानने 59 व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे जपानच्या आशा वाढल्या होत्या. मात्र भारताने अखेरच्या क्षणी जपानला रोखलं आणि सामना 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केला. भारताने या विजयासह सुपर 4 मध्ये धडक दिली आहे.

भारताची सुपर 4 मध्ये एन्ट्री

दरम्यान कझाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया हा सामना सोमवारी 1 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय संघ या सामन्यात कझाकिस्तान लोळवत विजयी हॅटट्रिक करणार का? याकडे हॉकी चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.