खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका, विजयादशमीनिमित्त महिला, पुरुष संघांनी लुटले सुवर्ण!

शुभम कुलकर्णी

Updated on: Oct 04, 2022 | 7:46 PM

अहमदाबाद येथिल संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये महाराष्ट्र संघानं मोठी कामगिरी केलीय.

खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका, विजयादशमीनिमित्त महिला, पुरुष संघांनी लुटले सुवर्ण!
विजयादशमीनिमित्त महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण!
Image Credit source: social

मयूरेश गणपत्ये, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रीय क्रीडा (sports) स्पर्धेत महाराष्ट्राच्या (Maharashtra) महिला आणि पुरुष संघांनी दसऱ्याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खोखो खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदकाची कमाई करत विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.

अहमदाबाद येथिल संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्र संघाने ओडिशाच्या संघावर डावाने विजय मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली.

महाराष्ट्र महिला खोखो संघाने 18-8 असा एक डाव आणि 10 गुणांनी ओडिशा संघाचा पराभव केला. महाराष्ट्र संघाकडून रुपाली बडे हिने 3 मिनीटे संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपी हिने अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांकानं 2.50 मि. आणि 3.50 मिं पळतीचा खेळ करत 2 गुण संघासाठी पटकविले.

प्रियांका इंगळे हिने 1.50 मिनीटे संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ करत केला. 8 गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री आणि मागी माझी यांनी उत्तम खेळाचं प्रदर्शन

करत त्यांच्यासंधाला बळकटी द्यायचा प्रयत्न केला. महिला संघाची कर्णधार शितल भोर हिने विजया बद्दल आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं , “महाराष्ट्रातील तमाम खोखो आणि क्रीडा प्रेमींना विजयादशमीनिमित्त सुवर्ण पदकाची भेट देता आली यापेक्षा दुसरा आनंद नाही.

अंतिम सामन्यात ओडिशा संघाला डावाने हरवून सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास होताच आणि प्रत्यक्षात सामना डावाने जिंकून आम्ही गोल्ड जिंकले याचा मोठा आनंद होत आहे, “

पुरुष गटात महाराष्ट्र संघाने केरळ संघाविरुद्ध आक्रमक खेळ खेळत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती.

मात्र, महाराष्ट्र संघाने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मिनीटे राखून व 4 गुणांनी (30-26) विजय साकारत गोल्ड मेडल पटकावले. महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरे याने 2 मिनीटे व 1.10 मिनीटे संरक्षण केले.

रामजी कश्यप याने 1.30 मिनीटे व 2 मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला. ह्रषिकेश मुर्तावडे याने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने 1.40 व 1.30 मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला व 6 गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाचा उचलला.

सुरेश गरगटे याने 1.20 मिनीटे संरक्षण केले व 14 गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतिका वाईकर याने 1.20 मिनीटे पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गावस याने 4 गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.

खोखो स्पर्धेत महाराष्ट्र संघांनी शानदार कामगिरी नोंदवत दुहेरी सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्रात खोखो खेळाची मोठी परंपरा आहे. या परंपरेला साजेशी अशी कामगिरी आज नोंदवत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दुहेरी सोनेरी यश खूपच आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचा महिला खोखो संघ : प्रियांका भोपी, प्रियांका इंगळे, ऋतुजा खरे, शीतल भोर, श्वेता वाघ, अपेक्षा सुतार, रेश्मा राठोड, रुपाली बडे, आरती कांबळे, गौरी शिंदे, पूर्वा मडके, जान्हवी पेठे, मयुरी पवार, दीपाली राठोड, संपदा मोरे. कोच – प्रवीण बागल, व्यवस्थापक रत्नराणी कोळी, कोच प्राची वाईकर.

महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ : राहुल मंडल, सागर पोतदार, अविनाश देसाई, मिलिंद कुरपे, अक्षय भांगरे, रामजी कश्यप, ह्रषिकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, सुरज लांडे, अक्षय मिसाळ, प्रतिक वाईकर, लक्ष्मण गावस, धीरज सेनगर, निहार दुबळे, विजय शिंदे. कोच – शिरीन गोडबोले, संघ व्यवस्थापक कमलाकर कोळी, डॉ. अमित रावटे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI