AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ख्रिस्तियानो रोनाल्डोची मँचेस्टर युनायटेड सोबतच्या करारावर मोहोर, दोन वर्षांसाठी करार, इतक्या कोटींना करारबद्ध

मेस्सीने बार्सिलोना संघ सोडल्यानंतर काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोही जुव्हेंटस संघ सोडून त्याचा जुना संघ मँचेस्टर युनायटेडमध्ये परतणार असल्याचं समोर आलं होत. आता ही बातमी पक्की झाली असून त्याने करारावरही स्वाक्षरी केली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोची मँचेस्टर युनायटेड सोबतच्या करारावर मोहोर, दोन वर्षांसाठी करार, इतक्या कोटींना करारबद्ध
ख्रिस्तियानो रोनाल्डो
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 4:04 PM
Share

मुंबई : जागतिक फुटबॉलमधील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) पुन्हा आपला जुना संघ मँचेस्टर युनायटेडमध्ये (manchester united) परतण्याचा निर्णय घेतला होता. युव्हेंट्स (Juventus) संघाचा साथ  सोडत रोनाल्डो पुन्हा एकदा आपल्या कारकिर्दीची सुरुवात झालेल्या संघात परतला आहे. तब्बल 12 वर्ष वाट पाहिल्यानंतर रोनाल्डोने पुन्हा मँचेस्टर गाठलं आहे.

2009 मध्ये मँचेस्टर सोडून स्पॅनिश लीगमधील रिअल माद्रीद (Real Madrid) संघात गेलेल्या रोनाल्डोने. त्यानंतर जुव्हेंटस संघात अप्रतिम खेळ दाखवला होता. आता पुन्हा तो मँचेस्टरमध्ये पोहोचला असून त्याने नुकताच दोन वर्षांचा करारही फायनल केला आहे. युनायटेड संघाने मंगळवारी दिलेल्या माहितीत रोनाल्डोसोबत दोन वर्षांसाठीचा करार ठरवला आहे. हा करार पुढे एक वर्ष वाढवलाही जाऊ शकतो. दरम्यान सध्या हा करार तब्बल 23 मिलियन यूरो म्हणजेच भारतीय रुपयांनुसार जवळपास 198 कोटी रुपये या किंमतीला झाला आहे.

युनायटेडमधून झाली होती सुरुवात

रोनाल्डो युव्हेंटसपूर्वी स्पेनच्या दिग्गज क्लब रियल माद्रिदकडून खेळत होता. तो 2009 मध्ये स्पॅनिश क्लबमध्ये पोहोचला आणि 2018 पर्यंत या क्लबमध्ये राहिला. त्याने या क्लबसह ला लीगची विजेतेपदंही पटकावली आहेत. माद्रिदपूर्वी रोनाल्डो इंग्लिश प्रीमियर लीगचा भाग होता. त्याने 2003 मध्ये मँचेस्टर युनायटेडसह त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि तिथूनच त्याला प्रसिद्धी मिळाली, जी पुढे जाऊन त्याने रियल माद्रिदकडून खेळताना अधिक बळकट केली. आता पुन्हा एकदा तो या क्लबसाठी खेळताना दिसणार आहे. 2003 ते  2009 दरम्यान रोनाल्डोने युनायटेड संघासोबत आठ महत्त्वाचे पुरस्कार जिंकले होते. त्याने 291 सामन्यात 118 गोल देखील केले होते.

हे ही वाचा

Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!

दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, Juventus सोडून जुन्या क्लबमध्ये परतला

(Manchester united Signs 2 year contract with cristiano ronaldo)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.