AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neeraj Chopra | नीरज चोप्रा याची ऐतिहासिक कामगिरी, वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पहिलाच भारतीय

Neeraj chopra Gold In world Championship 2023 | भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने इतिहास रचत जे कुणा भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलंय. नीरजने वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवलंय.

Neeraj Chopra | नीरज चोप्रा याची ऐतिहासिक कामगिरी, वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पहिलाच भारतीय
| Updated on: Aug 28, 2023 | 2:10 AM
Share

बुडापेस्ट | हंगरीची राजधानी बुडापेस्ट वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताचा ‘गोल्डन बॉय’ अशी ओळख असलेल्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या शिरपेचात मानाच तुरा खोवला आहे. नीरज चोप्रा याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये पाकिस्तानच्या अशरफ नदीम याचा खुर्दा उडवला. नीरज गोल्डन मेडल जिंकेल, असा विश्वास साऱ्या देशाला होता. नीरजने भारतीयांच्या विश्वास खरा ठरवला आणि पुन्हा एकदा त्याने स्वत:ला गोल्डन बॉय असं का म्हणतात हे सिद्ध करुन दाखवलं.नीरजने गोल्ड मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

नीरज वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं. नीरज यासह एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसराच भालाफेकपटू ठरला. तसेच पाकिस्तानच्या अशरफ नदीम याने दुसरा क्रमांक पटकावत सिल्वहर मेडलची कमाई केली.

नीरज चोप्रा याचा ऐतिहासिक थ्रो

नीरजने 2016 मध्ये ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती नीरज तेव्हा अ‍ॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला होता. आता 7 वर्षांनी नीरजने इतिहासाची पुनरावृत्ती करत सिनिअर लेवलला वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.