AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर स्वप्नील कुसाळेच्या आई-वडिलांची एका वाक्यात प्रतिक्रिया, तुमचाही उर येईल भरून

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या मातीमधील स्वप्निल कुसाळे याने कांस्यपदक जिंकलं आहे. आपल्या मुलाने देशासाठी पदक जिंकल्यावर त्याच्या आई-वडिलांनी पाहा काय प्रतिक्रिया दिली आहे.

ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर स्वप्नील कुसाळेच्या आई-वडिलांची एका वाक्यात प्रतिक्रिया, तुमचाही उर येईल भरून
| Updated on: Aug 01, 2024 | 6:24 PM
Share

कोल्हापूरच्या मातातील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकलं आहे. हे भारताचे तिसरे पदक असून ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात खाशाबा जाधवयांच्या नंतर पदक मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी आनंद उत्सव साजरा केला जातो त्याच्या या यशाचं ग्रामस्थांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. स्वप्निलचं हे यश ग्रामीण भागातील तरुणांना निश्चितच प्रेरणादायी असल्याचा आता ग्रामस्थांना वाटतंय, इतकच नाही तर स्वप्निल कोल्हापूरमध्ये येतात त्याची हत्तीवरून मिरवणूक काढू अशा शब्दात ग्रामस्थांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. स्वप्निनलच्या आई-वडिलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात ऑलिंपिक मध्ये कांस्यपदक पटकावलंय.  स्वप्नीलने आजपर्यंत केलेल्या कष्टाचं चीज झालं अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडील आणि आजीने दिली आहे.  मुलाच्या या यशामुळे कुसाळे यांचा उर अभिमानाने भरून आला आहे. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या गावातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाला उधाण आलंय.

या विद्यार्थ्यांनी तर त्यांनी स्वप्निल कुसाळे याची मॅच शाळेत स्क्रीनवर पाहिली. इतकंच नाहीतर कास्यपदक मिळवल्यानंतर त्यांनी तिरंगा आणि स्वप्निलचा फोटो हातात घेऊन रॅली देखील काढली. या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी स्वप्निलच्या नावाचा अक्षरशः जयघोष केला. स्वप्निल दादाची प्रेरणा घेऊनच आम्ही आमची वाटचाल करू असा इरादा देखील यावेळी सहभागी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वप्निलला दिलं हे आश्वासन

स्वप्नील हा आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल,  असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.  भारतासाठी स्वप्निलने या 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात पदक जिंकणारा एकमेव खेळाडू आहे.

स्वप्निल कुसाळे याने आपण माजी खेळाडू महेंद्र सिंह धोनी याची शिकल्याचं सांगितलं. कितीही दबावाची परिस्थिती असली तरीही शांत राहायचं त्याचप्रकारे मीसुद्धा शांत होतो आणि माझं लक्ष्य ध्येयाकडे असल्याचं स्वप्निल कुसाळे म्हणाला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.