Vinesh Phogat ची क्रीडा न्यायालयात धाव, मेडल मिळणार की नाही? गुरुवारी अंतिम निर्णय

Vinesh Phogat Appeal in CAS Against her Disqualification: महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक निश्चित केलं. मात्र त्यानंतर विनेशला अधिक वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आलं. विनेशने या निर्णयाविरुद्ध आपल्याला संयुक्तरित्या रौप्य पदक देण्यात यावं, यासाठी तिने खेळ लवादात धावा घेतली आहे.

Vinesh Phogat ची क्रीडा न्यायालयात धाव, मेडल मिळणार की नाही? गुरुवारी अंतिम निर्णय
Vinesh Phogat in cas paris olympics
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 1:55 AM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतीयांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महिला पैलवान विनेश फोगाट हीने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टकडे (CAS) तिला संयुक्तरित्या रौप्य पदक विजेता जाहीर करावं, अशा विनंतीची याचिका दाखल केली आहे. इतकंच नाही तर सुवर्ण पदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही तिने केली. मात्र सीएएसने सुवर्ण पदकाच्या सामन्याची विनंती फेटाळली आहे. त्यामुळे आता सीएएसकडून विनेशच्या संयुक्त रौप्य पदकाच्या विनंतीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे साऱ्या भारतीयांचं लक्ष असणार आहे. सीएएसने विनेशच्या बाजूने निर्णय दिल्यास तिला रौप्य पदक मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार विनेशच्या रौप्य पदकाच्या विनंतीवर 8 ऑगस्ट रोजी निर्णय देण्यात येणार आहे.

महिला पैलवान विनेश फोगाट हीने 6 ऑगस्ट रोजी 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारुन रौप्य पदक निश्चित केलं होतं. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी तिचा सुवर्ण पदकासाठीचा सामना होणार होता. मात्र त्याआधी विनेशचं वजन 100 ग्राम जास्त असल्याचं निदर्शनात आलं. त्यामुळे विनेशला अपात्र करण्यात आलं. त्यामुळे विनेशला रौप्य पदक मिळणार नसल्याचं सोबतच अंतिम फेरीसाठी अपात्र करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.

त्यानंतर आता विनेशने या निर्णयाला आव्हान देत सीएएसकडे याचिका दाखल केली आहे. विनेशने याचिकेद्वारे केलेल्या विनंतीला उत्तर देताना सीएएसने आम्ही सुवर्ण पदकाचा सामना थांबवू शकत नसल्याचं म्हटलं. त्यानंतर विनेशने संयुक्त रौप्य पदकासाठीची याचिका केली आहे. त्यामुळे सीएएसने आता विनेशच्या बाजूने निर्णय द्यावा, अशी साऱ्या भारतीयांना आशा आहे.

विनेशची क्रीडा न्यायालयात धाव

कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टबाबत थोडक्यात

खेळाडूंच्या तक्रारी-समस्यांचं निराकरण करण्यासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टची स्थापना करण्यात आली आहे. काही खेळाडूंची ही त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना असते. अशावेळेस संबंधित खेळाडू हे सीएएसकडे दाद मागू शकतात.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.