AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक पोलीस आणि डॉग स्क्वॉड पथक आलं, क्रिकेटर स्मृती मानधनाच्या लग्नाला काही तास बाकी असतानाच… नेमकं प्रकरण तरी काय?

सांगलीची कन्या, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, तिच्या विवाहसोहळ्याच्या जागी डॉग स्कॉड दाखल झाले आहे. आता नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अचानक पोलीस आणि डॉग स्क्वॉड पथक आलं, क्रिकेटर स्मृती मानधनाच्या लग्नाला काही तास बाकी असतानाच... नेमकं प्रकरण तरी काय?
Smriti MandanaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 22, 2025 | 1:05 PM
Share

सांगलीची कन्या आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांचा शाही विवाह सोहळा 23 तारखेला पार पडणार आहे. त्यासाठी सांगलीतील कवठेपिरांन रोड येथील मानधना फार्म हाऊस सजवण्यात आले आहे. काल या ठिकाणी रात्री हळदीचा समारंभ संपन्न झाला. आज मेहंदीचा आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी अचानक पोलीस आणि डॉगस्कॉड फार्महाऊसवर पोहोचले आहेत.

फार्महाऊसवर डॉग स्कॉड पथक दाखल

स्मृती मानधानाचा विवाहसोहळा पार पडणार असलेल्या फार्महाऊसवर सांगली पोलीस दलाच्या वतीने बॉम्ब शोधक डॉग स्कॉड पथक दाखल झाला आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर या शाही विवाह सोहळ्यासाठी येणार असल्यामुळे या डॉग्सच्या माध्यमातून विवाह स्थळाची संपूर्ण तपासणी आणि पाहणी करण्यात येत आहे. पण अचानक पोलीस आणि डॉग स्कॉड आल्यामुळे सर्वजण सुरुवातीला घाबरले. नंतर केवळ तपासाचा भाग असल्यामुळे पुन्हा सर्वजण आनंदाने मजामस्ती करु लागले.

लग्नापूर्वीही शादी प्रीमियर लीग

भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनांच्या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी रात्री शादी प्रीमियर लीग पार पडली. या निमित्ताने रात्री मानधना फार्म हाऊस जिथे विवाह सोहळा होणार आहे तिथे स्मृती, पलाशसह महिला खेळाडू, इतर पाहुण्यांनी क्रिकेट सामना खेळण्याचा आनंद घेतला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही कुटुंबीय, महिला खेळाडू आणि दोन्ही कडील मंडळीनी क्रिकेट खेळण्याचा, पाहण्याचा आनंद लुटला. उद्या सायंकाळी स्मृती आणि पलाशचा विवाह सोहळा पार पडणार आहे

भारतीय महिला संघाची उपकर्णधारणदारांनी सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा पार पडतोय धुमधडाक्यात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मानधना कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे.आणि लग्नसोहळ्यासाठी नवरदेव असणारे पलाश मूछल हे वऱ्हाड मंडळीसह सांगलीत दाखल झालेत. मानधना परिवाराकडून त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आले आहे, धुमधडाक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावत आहे, आज हळदीचा कार्यक्रम मोठ्या थाटा माठात पार पडला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.