करीनाच्या गाण्यावर प्राचीच्या अदा, पृथ्वी शॉ झाला फिदा, म्हणाला ‘कातिलाना’

प्राचीने केलेला डान्स पाहून पृथ्वी शॉला देखील राहवलं नाही. 'कातिलाना' म्हणत त्याने प्राचीच्या डान्स कौशल्याचं कौतुक केलं. (Prithvi Shaw Girl Friend Prachi Singh Belly Dance On Kareena kapoor Song)

करीनाच्या गाण्यावर प्राचीच्या अदा, पृथ्वी शॉ झाला फिदा, म्हणाला 'कातिलाना'
करीनाच्या गाण्यावर प्राचीच्या अदावर...

मुंबई :  भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची गर्लफ्रेंड प्राची सिंगने (Prachi Singh) बेली डान्सचा धुमाकूळ चालवलाय. एकापोठापाठ एक बेली गाण्यावरचे डान्स ती इन्स्टाग्रामवर अपलोड करतीय. तिचे बेली डान्स प्रेक्षकांना तर खूप आवडतात. आज तर कमाल झालीय. तिच्या डान्सवर तिने हृदय दिलेल्या पृथ्वीने थेट कमेंट केलीय. मग चर्चा तर होणार ना…! (Prithvi Shaw Girl Friend Prachi Singh Belly Dance On Kareena kapoor Song)

करीनाच्या गाण्यावर प्राचीच्या अदा

प्राची सिंगने इन्स्टाग्रामवर एका डान्सचा व्हिडीओ अपलोड केला आहे. करीना कपूरच्या अशोका चित्रपटातील ‘सन सना ना सन’ या गाण्यावर ती थिरकली आहे. तिच्या अदा पाहून पृथ्वी शॉलाही राहवलं नाही. त्यानेही इन्स्टाग्रामवर तिच्या डान्स कौशल्याला दाद दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prachi Singh (@prachisingh2202)

पृथ्वी शॉची प्राचीच्या डान्सवर कमेंट

याअगोदरही प्राचीने असे अनेक बेली डान्स तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पण आतापर्यंत पृथ्वी शॉने कधी कमेंट केली नव्हती. मात्र काल केलेला डान्स पाहून पृथ्वी शॉला देखील राहवलं नाही. ‘कातिलाना’ म्हणत त्याने प्राचीच्या डान्स कौशल्याचं कौतुक केलं.

Prithvi Shaw Comment On Prachi Singh Dance

केलेला डान्स पाहून पृथ्वी शॉला देखील राहवलं नाही. ‘कातिलाना’ म्हणत त्याने प्राचीच्या डान्स कौशल्याचं कौतुक केलं.

नेमकी कोण आहे प्राची सिंग?

प्राचीचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबई येथे झाला होता. प्राची ही छोट्या पडद्यावरची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 2019 मध्ये उडान सीरियलमधील वंशिका शर्माच्या भूमिकेत ती प्रथम कलर्स टीव्हीवर दिसली होती. तेव्हापासून तिच्या कामाला गती मिळाली.

‘डान्सर प्राची’ची ओळख

अभिनयाबरोबरच प्राचीला डान्सची आवड आहे. ती उत्तम बेली डान्स करते. प्राचीच्या इन्स्टाग्राममध्ये तिचे डान्स व्हिडीओ पाहायला मिळतील. इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. 19.8 हजारांहुन अधिक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

पृथ्वी प्राचीमध्ये नातं काय?

पृथ्वी शॉ प्राची सिंग हे एकमेकांना डेट करतात, अशा चर्चा आहेत. परंतु दोघांनीही आपण डेट करत असल्याचं जाहीरपणे कबूल केलं नाही. असं असलं तरी जेव्हा कधीही पृथ्वी सुंदर बॅटिंग करतो त्यावेळी प्राची जाहीरपणे प्रेमाचा इजहार करत पृथ्वीला सोशल मीडियावावरुन का होईना हृदय देते.

(Prithvi Shaw Girl Friend Prachi Singh Belly Dance On Kareena kapoor Song)

हे ही वाचा :

Video : पृथ्वी शॉ ची गर्लफ्रेंड प्राची सिंगचा जान्हवी कपूरच्या गाण्यावर अप्रतिम बेली डान्स, एकदा पाहाच!

Video : क्रिकेटमधला पहिला ओरिजनल मॅच फिनिशर, त्याच्या खास स्टाईलमध्ये संपवायचा मॅच!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI