AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी शास्त्री यांनी घेतली भगतसिंह कोश्यारी यांची भेट, चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?

रवी शास्त्री यांनी कोश्यारी यांची भेट का घेतली असावी, असा प्रश्न सध्या बऱ्याच जणांना पडला आहे. मात्र ही भेट कोणत्याही कारणास्तव झाली नसून सदिच्छा भेट असल्याचं राज्यपाल कार्यालयाने सांगितलं आहे. | Ravi Shastri met Bhagatsinh Koshyari

रवी शास्त्री यांनी घेतली भगतसिंह कोश्यारी यांची भेट, चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?
Ravi Shastri met Governor of Maharashtra Bhagatsinh Koshyari
| Updated on: Apr 01, 2021 | 8:20 AM
Share

मुंबई :  भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी (Ravi Shastri) बुधवारी (31 मार्च) महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) यांची भेट घेतली. मुंबईत राजभवनावर (Rajbhavan) ही भेट झाली. भेटीत कोश्यारी आणि रवी शास्त्री यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. भारतीय संघाने नुकताच इंग्लंडचा (India vs England) तिन्ही फॉरमॅटमध्ये पराभव केला आहे. त्यानंतर रवी शास्त्री यांनी कोश्यारी यांची भेट घेतली आहे. (Ravi Shastri met Governor of Maharashtra Bhagatsinh Koshyari)

भेटीचे फोटो व्हायरल

राज्यपाल कार्यालयाने रवी शास्त्री यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. तसंच कोश्यारी आणि शास्त्री यांच्या भेटीचा फोटोही ट्विट केला आहे. सोशल मीडियावर हे फोटो वेगाने व्हायरल होतायत.

शास्त्री-कोश्यारी सदिच्छा भेट

रवी शास्त्री यांनी कोश्यारी यांची भेट का घेतली असावी, असा प्रश्न सध्या बऱ्याच जणांना पडला आहे. मात्र ही भेट कोणत्याही कारणास्तव झाली नसून सदिच्छा भेट असल्याचं राज्यपाल कार्यालयाने सांगितलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गरमागरमी सुरु आहे. अनेक नेतेमंडळी राज्यपालांच्या भेटीसाठी सारखे राजभवनावर जात असतात. राज्यपालही त्यांना भेटत असतात. मात्र कितीतरी दिवसांतून क्रीडा विश्वातलं कुणीतरी राज्यपालांना भेटलं…. म्हणून रवी शास्त्री यांच्या राज्यपाल भेटीची जोरदार चर्चा सध्या रंगते आहे.

भारतीय संघाने इंंग्लंडला तिन्ही फॉरमॅटमध्ये नमवून बाजी मारली. कसोटी, टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय मालिकेत विराटच्या नेतृत्वाखालील टीमने पाहुण्या इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. यामध्ये रवी शास्त्री यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. आता इंग्लंडविरुद्धची मालिका आटपून भारतीय संघातले खेळाडू आयपीएलच्या तयारीसाठी आपापल्या फ्रेंचायजींसाठी रवाना झाले आहेत.

शास्त्री-कोश्यारी यांच्या भेटीचं कारण काय?

रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असल्याने ते आयपीएलमध्ये कोणतीही भूमिका वठवू शकत नाही वा भाग घेऊ शकत नाही. इथून पुढचे 50 ते 60 दिवस भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल खेळणार आहेत. त्यामुळे रवी शास्त्री यांच्याकडे आता जवळपास दोन महिन्यांचा वेळ असणार आहे. त्याअगोदर त्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आहे.

(Ravi Shastri met Governor of Maharashtra Bhagatsinh Koshyari)

हे ही वाचा :

युवा खेळाडू तयार, सिनियरच्या निवृत्तीचा काहीही फरक पडणार नाही; मोहम्मद शमीचं रोखठोक मत

केवळ दिल्लीचं नाही तर येणाऱ्या काळात रिषभ पंत भारताचं नेतृत्व करेन; या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

एकदिवसीय मालिकांचा हुकमी एक्का ! विराट कोहली ICC ODI रँकिंगमध्ये पहिला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.