धोनीकडून जाडेजाची नक्कल, आता ‘सर जाडेजा’चा भन्नाट रिप्लाय

जाडेजाच्या तलवारबाजीच्या स्टाईलची धोनीने नक्कल केलीय. आता सर जाडेजानेही धोनीला मजेशीर रिप्लाय दिला आहे. (Ravindra Jadeja Reply To MS Dhoni Over Sword Celebration)

धोनीकडून जाडेजाची नक्कल, आता 'सर जाडेजा'चा भन्नाट रिप्लाय
रवींद्र जाडेजा आणि एम एस धोनी
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 9:17 AM

मुंबई : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांची जोडी सुपरहिट आहे. अनेक मॅचेसमध्ये धोनीने स्टम्पमागून काहीतरी सांगावं, जाडेजाने ते फॉलो करावं आणि प्रतिस्पर्धी संघाची विकेट जावी, हे समीकरण गेले अनेक दिवस ठरलेलं…! आयपीएलमध्येही दोघेही चेन्नईकडून खेळतात. तिथेही धोनी-जाडेजा आपल्या खेळाने धमाल करतात. क्रिकेटशिवाय दोघांमध्येही विशेष जिव्हाळ्याचं नातं आहे. दोघेही अनेकवेळा एकमेकांची चेष्टा मस्करी करताना दिसून येतात. जाडेजाच्या एक स्टाईलची धोनीने नक्कल केलीय. आता सर जाडेजानेही धोनीला मजेशीर रिप्लाय दिला आहे. (Ravindra Jadeja Reply To MS Dhoni Over Sword Celebration)

धोनीकडून जाडेजाची नक्कल

आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धोनी अष्टपैलू रवींद्र जाडेजाची नक्कल करताना दिसून येत आहे. जाडेजा शतक किंवा अर्धशतक ठोकल्यानंतर जशी तलवारबाजी करतो तशीच तलवारबाजी व्हिडीओत धोनी करताना दिसून येत आहे.

जाडेजाचा मजेशीर रिप्लाय

मात्र धोनीच्या हातात बॅट दिसून येत नाहीय. जाडेजाने हिच गोष्ट हेरली. अन् धोनीला आपल्या अंदाजात रिप्लाय दिला. बॅट हातात असल्यानंतर असा प्रयत्न करायला हवा, असा मजेशीर रिप्लाय जाडेजाने धोनीला दिला.

Jadeja Reply Dhoni

जाडेजाचा धोनीला रिप्लाय

आयपीएलमध्ये जाडेजाची दमदार कामगिरी

नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएलमध्ये जाडेजाने हारदार कामगिरी केली. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात त्याने एकाच ओव्हरमध्ये 37 धावा लुटल्या तसंच 3 विकेट्स घेऊन बंगळुरुचं कंबरडं मोडलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं तर बॅट आणि बॉलच्या मधुर आवाजाने प्रेक्षकांचे कान मंत्रमुग्ध केले. पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलच्या (Harshal Patel) एकाच ओव्हरमध्ये जाडेजाने 37 धावांची लूट केली.

(Ravindra Jadeja Reply To MS Dhoni Over Sword Celebration)

हे ही वाचा :

ENG vs NZ : इंग्लंडला मोठा झटका, या कारणामुळे जोफ्रा आर्चर कसोटी संघाबाहेर!

आधी म्हणाली विराट माझा फेव्हरेट, आता सांगितलं दुसरंच नाव, रश्मिका मंदानाने कोहलीसह RCB च्या चाहत्यांचं हृदय तोडलं!

‘माही सरांकडून मला खूप मदत मिळाली’, भारतीय महिला क्रिकेट संघातील या खेळाडूला धोनीची शिकवणी!

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.