हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध टी ट्वेन्टीत केला होता रेकॉर्ड, किवी फलंजादाने महिनाभरही टिकू दिला नाही !

न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गुप्टीलने बांगलादेशविरुद्धच्या टी ट्वेन्टी सामन्यात 26 वा रन्स घेताच रोहितचा विक्रम त्याने मोडित काढला.

हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध टी ट्वेन्टीत केला होता रेकॉर्ड, किवी फलंजादाने महिनाभरही टिकू दिला नाही !
Rohit Sharma

मुंबई : टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (ICC T20) सर्वाधिक रन्स भारतीय कर्णधार विराट कोहली (ViratvKohli) च्या नावावर आहेत. त्याखालोखाल हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) क्रमांक लागतो. पण आता रोहितच्या दुसऱ्या क्रमांकाची जागा किवी फलंदाजाने घेतली आहे. न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गुप्टीलने (Martin Guptil) बांगलादेशविरुद्धच्या टी ट्वेन्टी सामन्यात 26 वा रन्स घेताच रोहितचा विक्रम त्याने मोडित काढला. आता विराटनंतर टी ट्वेन्टी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा गुप्टीलच्या आहेत. (Rohit Sharma record Against England T20 broken By Martin guptil In Hamilton)

टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये चौकार षटकार आणि रन्सचा पाऊस पडतो. प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही रेकॉर्ड होत असतो तसंच तो रेकॉर्ड तुटत असतो. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेत सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर स्थान मिळवलं. त्याला महिनाही उलटत नाही तोपर्यंतच मार्टिन गुप्टीलने त्याचा रेकॉर्ड मोडित काढत आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली आहे.

गुप्टिलने 35 रन्स करत रोहितचा विक्रम मोडला

मार्टिन गुप्टीलने रोहितचा रेकॉर्ड बांगलादेशविरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेत मोडला. हॅमिल्टनमध्ये पहिल्या टी ट्वेन्टीत गुप्टिलच्या बॅटमधून जास्त रन्स निघाले नाहीत. त्याने 27 चेंडूचा सामना करताना 3 चौकार आणि 2 षटकारंच्या मदतीने 35 धावा केल्या. परंतु त्याचे एवढेच रन्स रोहितचा रेकॉर्ड तोडण्यासाठी पुरेसे ठरले.

मार्टिन गुप्टीलची 100 वी ट्वेन्टी मॅच

आंतरराष्ट्रीय टी ट्वेन्टी क्रिकेटमधील पाठमागच्या 95 डावांत 2839 रन्स करुन बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेन्टीत 26 वीर रन्स घेत त्याने रोहितचा रेकॉर्ड तोडला. मोठी गोष्ट म्हणजे त्यची ही 100 वी आंतरराष्ट्रीय टी ट्वेन्टी मॅच होती. त्याच्या नावावर सध्या 2864 रन्स आहेत. तर विराटच्य नावावर 84 टी ट्वेन्टी सामन्यात 3159 रन्स आहेत.

(Rohit Sharma record Against England T20 broken By Martin guptil By Hamilton)

हे ही वाचा :

आयपीएल आधी जॉस बटलरचा इशारा, म्हणतो, ‘या बॅट्समनपासून सावध रहा नाहीतर चिंधड्या उडवेन..!’

विस्फोटक फलंदाज क्रुणाल पांड्या हे काम करु शकत नाही, सुनील गावस्करांनी सांगितली ‘कमी’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI