मुंबई : भारत-पाकिस्तानमध्ये रविवारी ( 16 जून) खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. या मॅचचे सर्व श्रेय मॅन ऑफ द मॅच रोहित शर्माला जाते. रोहित शर्माच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताचा विजय सोयीस्कर झाला. रोहितने 113 चेंडूत 140 धावा केल्या, तसेच 14 चौकार आणि 3 षटकार ठोकत शतकही पूर्ण केले. यामधील एका षटकाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकरच्या षटकाराची आठवण करुन दिली.