AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | साडे आठ मिनिटात 2 किलोमीटर रनिंग, टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बीसीसीायचं ‘टार्गेट’

बीसीसीआयच्या या नव्या नियमाची अंमलबजावणी इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिकेपासून करण्यात येणार आहे.

Team India | साडे आठ मिनिटात 2 किलोमीटर रनिंग, टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बीसीसीायचं 'टार्गेट'
टीम इंडियाचे खेळाडू सराव करताना
| Updated on: Jan 22, 2021 | 2:50 PM
Share

मुंबई : खेळाडूंसाठी फिटनेस फार महत्वाचा असतो. खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना कसून सराव करावा लागतो. यासाठी अनेक खेळाडू जीममध्ये तसेच सामन्याआधी नेट्समध्ये जोरदार सराव करतात. या फिटनेसवरच सर्व काही अवलंबून असतं. क्रिकेटमध्ये (Cricket) धावा घेताना तसेच फिल्डिंग करताना खेळाडूंच्या फिटनेसचा कस लागतो. खेळाडूंना आता फिटनेस टेस्ट (Fitness Test)  द्यावी लागणार आहे. बीसीसीआयशी (BCCI)  करार केलेल्या प्रत्येक खेळाडूला या फिटनेस टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिलं आहे. (running 2 km in eight and a half minutes bcci target for team india players)

बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 2 किलोमीटर रनिंग अनिवार्य केली आहे. खेळाडूंना हे 2 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. या ठराविक वेळेत हे 2 किलोमीटरचं अंतर पूर्ण करावं लागणार आहे. वेगवान गोलंदाजांना 2 किलोमीटरचं अतंर 8 मिनिटं 15 सेकंदांमध्ये पूर्ण करायचे आहे. तर विकेटकीपर, स्पिनर आणि फलंदाजांना हे अंतर 8 मिनिटं 30 सेकंदात हे अंतर पूर्ण करावं लागणार आहे. या रनिंगद्वारे खेळाडू शारिरीकरित्या किती फिट आहे, हे पाहिलं जाणार आहे. त्यामुळे आता खेळाडूंना आणखी सराव करावा लागणार आहे. या नव्या नियमाबाबतची माहिती खेळाडूंना देण्यात आली आहे.

बीसीसीआयने काय म्हटलंय?

“खेळाडूंचं फिटनेस त्यांच्या यशाचं रहस्य असतं. पण आता खेळाडूंना फिटनेसमध्ये आणखी सुधार करण्याची गरज आहे. हे करणं आपल्यासाठी महत्वाचे आहे. या ट्रायल रन चॅलेंजमुळे खेळाडू आणखी तंदुरुस्त होतील. बीसीसीआयकडून दरवर्षी खेळाडूंच्या फिटनेसचा आढावा घेतला जाईल”, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली.

नियमाची अंमलबजावणी केव्हापासून ?

या नव्या नियमाची अंमलबजावणी इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिकेपासून खेळण्यात येणार आहे. या मालिकेत खेळण्यासाठी खेळाडूंना ही फिटनेस टेस्ट देणं बंधनकारक राहणार आहे. याशिवाय आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी ही टेस्ट द्यावी लागणार आहे. खेळाडूंना ही टेस्ट बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट एकेडॅमीमध्ये किंवा टीम इंडियाच्या संबधित अधिकाऱ्यांसमोर देता येणार आहे.

संबंधित बातम्या :

England Tour India | “टीम इंडियाला भारतात पराभूत करणं अवघड”

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

(running 2 km in eight and a half minutes bcci target for team india players)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.