Ind Vs Aus | BCCI ने पेटारा उघडला, टीम इंडियाला बोनस जाहीर, जय शहांची मोठी घोषणा

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय क्रिकेट संघाला पाच कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला (Ind Vs Aus BCCI bonus )

Ind Vs Aus | BCCI ने पेटारा उघडला, टीम इंडियाला बोनस जाहीर, जय शहांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 2:07 PM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) टीम इंडियाने (Team India win) धडाकेबाज विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाचव्या दिवशी 3 विकेट्स राखून बाजी मारली आणि कांगारुंची घमेंड उतरवली. त्यानंतर बीसीसीआयने शाबासकी म्हणून टीम इंडियावर बक्षिसांची खैरात केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तब्बल पाच कोटी रुपयांचा घसघशीत बोनस जाहीर केला. (Ind Vs Aus BCCI Secy Jay Shah announced 5 Crore as team bonus after India wins in Australia)

जय शाहांकडून पाच कोटींचा बोनस

वर्णद्वेषी टिपण्या ते प्रेक्षकांकडून शिव्यांच्या लाखोल्या, अशा अनेक प्रसंगांना तोंड दिलेल्या टीम इंडियाने, केवळ कसोटी सामनाच जिंकला असं नाही. तर कांगारुंच्या नाकावर टिच्चून चार सामन्यांची मालिकाही 2-1 अशी खिशात टाकली. त्यानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय क्रिकेट संघाला पाच कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला. “भारतीय क्रिकेटसाठी हे खास क्षण आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताना उत्कृष्ट कामगिरी केली” असं ट्विट जय शाह यांनी केलं आहे.

“लक्षणीय विजय. ऑस्ट्रेलियाला जाऊन अशा पद्धतीने कसोटी मालिका जिंकणे, हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम स्मरणात ठेवले जाईल. बीसीसीआय पाच कोटी रुपयांचा बोनस संघाला जाहीर करत आहे. या विजयाचं मूल्य आकड्यांच्या पलिकडचं आहे. दौऱ्यावरील संघाच्या प्रत्येक सदस्याचं अभिनंदन” अशा भावना बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी व्यक्त केल्या. (Ind Vs Aus BCCI Secy Jay Shah announced 5 Crore as team bonus after India wins in Australia)

आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल

या विजयामुळे टीम इंडिया आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर जाऊन पोहोचली आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रिस्बेन कसोटीतील विजयासह भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर धूळ चारण्याचा हा पराक्रम अनेक अर्थांनी विशेष ठरला आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

ब्रिस्बेन कसोटीतील टीम इंडियाच्या रोमांचक विजयानंतर ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणाला….

PHOTO | कांगारुंना लोळवलं, टीम इंडियाच्या धडाकेबाज विजयाचे फोटो

(Ind Vs Aus BCCI Secy Jay Shah announced 5 Crore as team bonus after India wins in Australia)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.