AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup 2025 : टीममधून काढलं, वडिलांना आला हार्ट अटॅक, संकटामागून संकटाने शेफाली कोलमडली अन् अचानक एका कॉलने बदललं नशीब

Womens World Cup 2025 : WC मध्ये खेळण्याआधी शेफालीच्या आयुष्यात काय घडलेलं? वडिलांना आला हार्ट अटॅक, संकटामागून संकटाने..., अचानक आलेल्या एका कॉलने बदललं भारताच्या लेकीचं नशीब

Womens World Cup 2025 :  टीममधून काढलं, वडिलांना आला हार्ट अटॅक, संकटामागून संकटाने शेफाली कोलमडली अन् अचानक एका कॉलने बदललं नशीब
फाईल फोटो
| Updated on: Nov 03, 2025 | 12:55 PM
Share

Womens World Cup 2025 : असं म्हणतात ना वेळेच्या आधी आणि नशिबात जे आहे त्याच्यापेक्षा काही कमी आणि काही जास्त मिळत नाही… त्यासठी फक्त आणि फक्त मेहनत आणि चिकाटीची गरज असते… असं काही रविवारी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2025 सामन्यात दिसून आलं… भारतीय महिला क्रिकेट संघाची दमदार खेळाडू शेफाली वर्मा हिच्यासोबत… रविवारी भारताला जे यश मिळालं आहे… त्यामध्ये या भारताच्या लेकीचा फार मोठा वाटा आहे. आता प्रत्येकाच्या तोंडावर शेफाली वर्मा हिचं नाव आहे. पण विक्रम रचण्यापूर्वी शेफाली हिने अनेक संकटांचा सामना केला.

शेफाली कशी झाली भारतीय संघात एन्ट्री?

उपांत्य फेरीपूर्वी दुखापत झालेल्या प्रतीका रावलच्या जागी शेफाली वर्माचा विश्वचषक संघात समावेश करण्यात आला. जेव्हा प्रतीकाला दुखापत झाली तेव्हा शेफाली वर्मा देशांतर्गत टी-20 मालिकेत खेळत होती. पण अशक्य शक्य होतं… तेव्हा त्यावर विश्वास ठेवणं फार कठीण असतं… प्रतीका हिला दुखापत झाल्यानंतर शेफाली हिला एक फोन कॉल आला आणि तिची एन्ट्री फायनलमध्ये झाली…

सेमीफायनलमध्ये शेफालीने चांगली कामगिरी केली नाही, पण अंतिम फेरीत तिने बॅट आणि बॉलने दमदार खेळ करून तिच्या हृदयातील आग शांत केली. अंतिम सामन्यात, शफालीने फलंदाजी करताना 78 चेंडूत 87 धावा केल्या. या डावात तिने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर तिने 7 षटकांत 36 धावा देत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

शेफाली वर्माची वीरेंद्र सेहवाग याच्यासोबत तुलना

जेव्हा शेफाली वर्माने भारतीय संघासाठी पदार्पण केले तेव्हा आक्रमक फलंदाजीमुळे शेफालीची तुलना वीरेंद्र सेहवागशी झाली. पहिल्या चेंडूपासून पॉवर शॉट्स मारण्याची क्षमता असलेल्या शफालीने काही वेळातच गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली, परंतु तिच्या आक्रमक फलंदाजीच्या दृष्टिकोनामुळे शफालीलाही संघातून वगळण्यात आलं.

सतत वाईट प्रदर्शनामुळे 2024 मध्ये ऑस्ट्रिलियाल दौऱ्यातून शेफाली हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आली. शेफाली हिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता… कारण टीममधून बाहेर होण्याच्या दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आलेला. पण टीममधून वगळण्यात आलंय… ही गोष्ट शेफाली हिने वडिलांपासून लपवून ठेवली… पण शेफालीने माघार घेतली नाही आणि स्थानिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी कठोर परिश्रम केले. शेफालीने केवळ तिचा फॉर्म परत मिळवला नाही तर तिची तंदुरुस्तीही सुधारली, जी विश्वचषक अंतिम सामन्यात स्पष्ट झाली.

आयसीसी महिला विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 298 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेवर मात करत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे.

नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.
आम्ही श्रीमंतांचे शेठ नसून गोरगरिबांचे शेठ... भरत गोगावलेंचा हल्लाबोल
आम्ही श्रीमंतांचे शेठ नसून गोरगरिबांचे शेठ... भरत गोगावलेंचा हल्लाबोल.
जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?
जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?.
हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?
हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?.
नवाब मलिक प्रकरणामुळे महायुती चर्चेत अडथळा, भाजपचा विरोध स्पष्ट
नवाब मलिक प्रकरणामुळे महायुती चर्चेत अडथळा, भाजपचा विरोध स्पष्ट.