AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्विनची चलाखी की फसवणूक, बटरलच्या रनआऊटवरुन वाद

IPL 2019 RR vs KXIP जयपूर: आयपीएलमध्ये रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या 12 वर्षांच्या इतिहासात पंजाबने राजस्थानच्या घरच्या मैदानात त्यांचा पहिल्यांदाच पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या. मात्र राजस्थानला 20 षटकात 9 बाद 170 धावांपर्यंतच मजल मारली. या सामन्यात […]

अश्विनची चलाखी की फसवणूक, बटरलच्या रनआऊटवरुन वाद
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

IPL 2019 RR vs KXIP जयपूर: आयपीएलमध्ये रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या 12 वर्षांच्या इतिहासात पंजाबने राजस्थानच्या घरच्या मैदानात त्यांचा पहिल्यांदाच पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या. मात्र राजस्थानला 20 षटकात 9 बाद 170 धावांपर्यंतच मजल मारली. या सामन्यात पंजाबच्या विजयापेक्षा त्यांचा कर्णधार आर अश्विनच्या वादग्रस्त वागणुकीची चर्चा गाजत आहे.

राजस्थानची वाटचाला विजयाच्या दिशेने सुरु होती, मात्र जोस बटलरच्या वादग्रस्त रनआऊटमुळे राजस्थानचा पराभव झाला.

अर्धशतक ठोकणाऱ्या जोस बटलरला पंजबचा कर्णधार आर अश्विनने अजबरित्या धावबाद केलं. अश्विन बोलिंगसाठी आला होता, मात्र त्याने बोलिंग टाकण्याची कृती करत, ऐनवेळी चेंडू नॉन-स्ट्राईककडील दांड्यावर मारत, जोस बटलरला धावबाद केलं. अश्विन बॅट्समनच्या दिशेने बॉल टाकणार म्हणून जोस बटरल धाव घेण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला होता. मात्र अश्विनने त्याला फसवत, धावबाद केलं. तिसऱ्या पंचांनी अर्थात थर्ड अंपायरने मंकड नियमाप्रमाणे जोस बटलरला बाद ठरवलं. मात्र त्यादरम्यान अश्विन आणि बटलरची बाचाबाची झाली.

13 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर हा सर्व ड्रामा झाला.  यावेळी राजस्थानची धावसंख्या 1 बाद 108 अशी होती.  मैदानात संजू सॅमसन (12) आणि जोस बटलर 43 चेंडूत 69 धावा करत नॉनस्ट्रायकरला होता. त्यावेळी अश्विनने क्रीज सोडून धाव काढण्यासाठी पुढे गेलेल्या बटलरला समज न देता थेट रनआऊट केलं.

या प्रकारानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशा पद्धतीने समज न देता रनआऊट करणं योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. हे शालांतर्गत क्रिकेट नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट आहे, त्यामुळे असं करणं योग्य नाही, असं दिग्गजांनी म्हटलं.

या सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेही अश्विनच्या वर्तनावर नाराज दिसला.  सामना संपल्यानंतर त्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.