AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धा खेळण्यासाठी देशाचा संघ सोडण्याची तयारी, नेमकं काय झालं ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकताना दिसत आहे. पण अजूनही काही खेळाडू संघात रूजू झालेले नाहीत. तर काही खेळाडूंना अजूनही एनओसी मिळालेली नाही. असंच काहीसं वेगवान गोलंदाज नुवान तुषाराच्या बाबतीत घडलं आहे.

IPL 2026 स्पर्धा खेळण्यासाठी देशाचा संघ सोडण्याची तयारी, नेमकं काय झालं ते जाणून घ्या
IPL 2026 स्पर्धा खेळण्यासाठी देशाचा संघ सोडण्याची तयारी, नेमकं काय झालं ते जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 30, 2026 | 4:11 PM
Share

Nuwan Thushara: आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात झाली असून दोन सामने पार पडले आहेत. प्रत्येक सामन्यानंतर ही स्पर्धा आता पुढे चालली आहे. त्यामुळे संघाच्या जमेच्या बाजू आणि उणीवा समोर येत आहे. असं असताना प्लेइंग 11 मध्ये कोण असावं आणि कोण नसावं याचं आकलन केलं जात आहे. पण काही फ्रेंचायजी अजूनही खेळाडूंच्या प्रतीक्षेत आहेत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. काही खेळाडूंना क्रिकेट बोर्डाने एनओसी दिलेली नाही. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा या यादीत येत आहे. कारण श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या फिटनेस टेस्टमध्ये फेल गेला होता. त्यामुळे त्याला आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या नव्या पॉलिसीनुसार, फिटनेस टेस्ट पास केल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला विदेशी लीग स्पर्धेत खेळता येणार नाही. नुवान तुषारा यात फेल झाला असून आरसीबी संघात सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता नुवान तुषाराने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला सांगितलं की, सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये निवडू नका.

आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार?

आयपीएल स्पर्धेसाठी आरसीबीने 1.6 कोटी खर्च करून नुवान तुषाराला आपल्या संघात घेतलं आहे. पण अजूनही श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून एनओसी मिळालेली नाही. आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीसाठी काहीही करून खेळण्याची तयारी नुवान तुषारा दर्शवली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तिलांजली तयारी दर्शवली आहे. श्रीलंका मिडिया रिपोर्टनुसार, नुवान तुषारा फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाला सांगितलं की त्याला सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये निवडू नये.’ श्रीलंका क्रिकेटमधील अनेक खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल झाले आहेत. त्यामुळे त्यांना टीमसाठी खेळणं कठीण आहे.

नुवान तुषाराकडे टी20 स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. कारण त्याची गोलंदाजीची शैली ही लसिथ मलिंगासारखी आहे. त्याच्याकडे पावरप्लेमध्ये चेंडू स्विंग आणि डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे. आयपीएल 2024 स्पर्धेत नुवान तुषारा मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. त्यानंतर मागच्या वर्षी आरसीबीसाठी फक्त एक सामना खेळला होता. नुवान तुषारा आतापर्यंत आयपीएलमध्ये 8 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. आता नुवान तुषारा आयपीएल 2026 स्पर्धेत खेळताना दिसेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.