AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…

माझं मन साफ आहे, मी कुणालाही दोष दिला नाही, असं स्पष्टीकरण आज लाईव्ह कॉमेन्ट्रीदरम्यान सुनील गावस्करांनी दिलं. (Sunil Gavaskar Reply Anushka sharma To Live Commentary Ipl Match)

अनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले...
| Updated on: Sep 25, 2020 | 11:48 PM
Share

यूएई :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी आजच्या आयपीएलच्या लाईव्ह सामन्याच्या कॉमेन्ट्रीदरम्यान या वादावर भाष्य केलं. माझं मन साफ आहे, मी कुणालाही दोष दिला नाही, असं स्पष्टीकरण गावस्कर यांनी दिलं. (Sunil Gavaskar Reply Anushka sharma To Live Commentary Ipl Match)

दुबईत चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान कॉमेन्ट्री करताना गावस्कर यांनी या मुद्द्यावर अधिकचं स्पष्टीकरण दिलं. “खेळाडूंच्या सरावासंदर्भात बोलणं चाललेलं असताना मी लॉकडाऊनमध्ये विराटला सरावाची संधी मिळाली नाही, एवढंच मी म्हणालो. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला”, असं गावस्कर म्हणाले.

“आम्ही सगळे कॉमेंटेटर खेळाडूंच्या सरावाबद्दल बोलत असताना मी विराटच्या लॉकडाऊनमधील सरावाबाबत बोलून गेलो. त्याचा अनुष्काबरोबरचा बिल्डिंग कम्पाऊंडमधील प्रॅक्टिसचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यावरूनच मी म्हटलं की लॉकडाऊनमध्ये विराटने फक्त अनुष्काची बॉलिंग खेळली. माझे फक्त एवढेच शब्द होते”, असं गावस्कर म्हणाले.

सुनील गावस्करांच्या आक्षेपार्ह कमेंटनंतर भडकलेल्या अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज (25 सप्टेंबर) एका वृत्तवाहिनीशी बोलताना “माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. तसंच माझ्या वक्तव्याला तोडून मोडून दाखवण्याचा प्रयत्न झाला. अनुष्का आणि विराटला मी सांगू इच्छितो की माझी व्हीडिओ क्लिप तुम्ही पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.

गावस्करांना उत्तर देणारी अनुष्काची सडेतोड इन्टाग्राम पोस्ट

“मिस्टर गावस्कर मी आपला सन्मान करते पण मला तुमची कमेंट आवडली नाही. मी तुम्हाला प्रत्युत्तर देऊ इच्छिते. मिस्टर गावस्कर आपण माझ्या पतीच्या (विराटच्या) खेळीबद्दल बोलताना माझ्या नावाचा उल्लेख केला. अनेक वर्षांपासून मला माहिती आहे की क्रिकेटर्सच्या खाजगी आयुष्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करता. आपल्याला वाटत नाही का की आम्ही देखील त्याचे हकदार आहोत?” आपण दुसऱ्या कोणत्याही शब्दात माझ्या पतीच्या (विराटच्या) खेळावर टीका करू शकला असतात. परंतू आपण टीका करत असताना त्यामध्ये माझं नाव देखील घेतलं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे बरोबर केलंय?”“सध्या 2020 हे वर्ष सुरू आहे मात्र माझ्यासाठी आजही काही गोष्टी चांगल्या होत नाहीत. माझं नाव नेहमी क्रिकेट कॉमेन्ट्रीमध्ये ओढलं जातं. मी तुमचा खूप सन्मान करते. तुम्ही या खेळाचे लेजेंड आहात. मी तुम्हाला फक्त सांगू इच्छिते, आपणही समजू शकता की तुम्ही माझं नाव घेतल्यावर मला कसं वाटलं असेल?”, असं अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले होते?

सुनील गावस्कर हे कॉमेंट्रीदरम्यान विराटच्या खेळीबद्दल बोलत होते. त्याच्या खेळीची मिमांसा करताना त्यांनी विराट-अनुष्काबद्दल (Anushka Sharma) आक्षेपार्ह टिप्पणी केली. “विराटने फक्त अनुष्काच्या गोलंदाजीचा सराव केला” त्यांच्या या टिप्पणीमुळे विराटचे चाहते नाराज झाले आहेत. दुसरीकडे गावस्कर यांच्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात येतोय, असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत. लॉकडाऊनमध्ये विराट पत्नी अनुष्कासोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुनील गावस्कर याच व्हिडिओचा संदर्भ घेऊन बोलले असतील असंही म्हटलं जातंय.

संबंधित बातम्या

माझ्या कमेंटची मोडतोड, भडकलेल्या अनुष्काला गावस्करांचं उत्तर

कॉमेंट्रीदरम्यान आक्षेपार्ह कमेंट, अनुष्काचं सुनील गावस्करांना सडेतोड उत्तर

कॉमेंट्रीत विराट-अनुष्काविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, सुनील गावस्करांवर चाहते बरसले

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.