AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच दौऱ्यात एकदिवसीय, टी-20, टेस्ट डेब्यू करत इतिहास रचला, तरीही BCCI ची ‘बक्षिसी’ नाही

बीसीसीआयने (BCCI) 2 दिवसांपूर्वी खेळाडूंचे वर्षभराच्या कालावधीसाठी वार्षिक कराराची (Annual Player Retainership) घोषणा केली.

एकाच दौऱ्यात एकदिवसीय, टी-20, टेस्ट डेब्यू करत इतिहास रचला, तरीही BCCI ची 'बक्षिसी' नाही
T Natarajan
| Updated on: Apr 17, 2021 | 9:54 PM
Share

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) 2 दिवसांपूर्वी खेळाडूंचे वर्षभराच्या कालावधीसाठी वार्षिक कराराची (Annual Player Retainership) घोषणा केली. यामध्ये बीसीसीआयने 4 श्रेणीमध्ये खेळाडूंची वर्गवारी करत त्यांची वेतन जाहीर केले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं (Mohammed Siraj) नशीब फळफळलं आहे. सिराजला वर्षभरासाठी बीसीसीआयने सी श्रेणीत स्थान दिले आहे. त्यामुळे सिराजला या कालावधीसाठी 1 कोटी मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला एकाच दौऱ्यात भारताच्या एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघासाठी डेब्यू करणाऱ्या टी. नटराजनला कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. याचाच अर्थ नटराजनला बीसीसीआयकडून केवळ सामना शुल्क मिळेल. याशिवाय वार्षिक पैसे मिळणार नाहीत. (T Natarajan fails to get BCCI annual contract, here’s the reason)

दरम्यान, भारताच्या क्रिकेट संघात संधी मिळूनही त्या संधीचा फायदा न उठवणारे केदार जाधव (Kedar Jadhav) आणि मनीष पांडे (Manish Pandey) यांना बीसीसीआयने कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून वगळलं आहे. आयपीएलचा शानदार मोसम सुरु असताना या खेळाडूंना मोठा धक्का बसलाय. त्यामुळे बीसीसीआयने केदार जाधव, मनिष पांडेच्या आंतरराष्ट्रीय खेळीला कायमचा फुल्लस्टॉप दिलाय की काय?, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नटराजनला कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये स्थान मिळालं नाही. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने संघात पदार्पण केले. या दौर्‍यावर त्याने टी -20, एकदिवसीय आणि कसोटी संघात पदार्पण केलं. नटराजन आतापर्यंत भारतासाठी एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि तीन टी -20 सामने खेळला आहे. त्यात त्याने एकूण 13 बळी घेतले आहेत. मिळालेल्या संधीत त्याने चांगली कामगिरी केली आहे. तरीही त्याला बीसीसीआयचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेले नाही.

नटराजनचा कॉन्ट्रॅक्ट यादीत समावेश का नाही?

वार्षक करारात नटराजनचा समावेश न होण्यामागे बीसीसीआयचा एक प्रमुख नियम आहे. बीसीसीआयच्या वार्षिक करारात सहभागी होण्यासाठी कोणत्याही खेळाडूला एका हंगामात कमीत कमी तीन कसोटी किंवा आठ एकदिवसीय किंवा 10 टी -20 सामने खेळावे लागतात. यामुळे नटराजनला

4 श्रेणीत खेळाडूंची वर्गवारी

बीसीसीआयने कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची वर्गवारी केली आहे. त्यानुसार खेळाडूंचं वेतन जाहीर केलं आहे. यामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार प्रकारात खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

श्रेणीनिहाय वेतन

  • Grade A+ : 7 कोटी
  • Grade A : 5 कोटी
  • Grade B : 3 कोटी
  • Grade C : 1 कोटी

विराट-रोहित-बुमराहला 7 कोटी मानधन

बीसीसीआयने करार केल्यानुसार भारताच्या 28 क्रिकेटपटूंना 4 कॅटॅगरीमध्ये (श्रेणी) समाविष्ट केलं गेलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kolhi), एकदिवसीय आणि टी-20 संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) तसंच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहेत म्हणजेच त्यांचा समावेश लिस्ट ए श्रेणीमध्ये करण्यात आलेला आहे. या तीन क्रिकेटपटूंना 7 कोटी रुपयांचं वर्षिक मानधन मिळणार आहे.

ए श्रेणी

बीसीसीआयने रवीचंद्रन अश्विन, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, के एल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि रवींद्र जाडेजा या खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळे या खेळाडूंना 5 कोटी मिळणार आहेत.

बी श्रेणी

बीसीसीआयने मयंक अगरवाल, रिद्धीमान साहा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर या खेळाडूंना स्थान दिलं आहे. यामुळे या खेळाडूंना 3 कोटी मिळणार आहे.

सी श्रेणीत एकूण 10 जणांचा समावेश

बीसीसीआयने सी श्रेणीत एकूण 10 खेळाडूंचा समावेश केला आहे. यात कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे. यामुळे या खेळाडूंना वार्षिक 1 कोटी मिळणार आहे.

केदार आणि मांडेकडून निराशा

आतापर्यंत बीसीसीआयच्या लिस्टमध्ये केदार जाधव आणि मनीष पांडे यांचा समावेश होता. परंतु भारतीय संघात वेळोवेळी संधी देऊनही या दोघांकडून सातत्यपूर्ण खेळ झाला नाही. किंबहुना त्यांना मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं नाही. याचमुळे बीसीसीआयने त्यांना कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून वगळल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

MI v SRH IPL 2021, Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्माची विक्रमाला गवसणी, महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक

IPL 2021 : ड्वेन ब्राव्होने केलेला ‘वाथी कमिंग’ गाण्यावरचा डान्स पाहिलात का?, अंबाती रायुडूही हसून लोटपोट!

IPL 2021 : शेजारी मरीन ड्राईव्ह आणि समुद्राच्या लाटा, धोनी-शाहरुखमध्ये कशावर बाता?, या फोटोची एकच चर्चा!

(T Natarajan fails to get BCCI annual contract, here’s the reason)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.