IND vs PAK Asia Cup 2025 : BCCI ने फक्त एकदा सांगावं..पाकिस्तान विरुद्ध मॅचआधी टीम इंडियाच्या कोचच मोठ स्टेटमेंट
IND vs PAK Asia Cup 2025 : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचने मौन सोडलं आहे. उद्या आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान या हायप्रोफाइल सामना होणार आहे. नेहमीच भारत-पाकिस्तान सामन्याची क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुक्ता असते.

आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तानच्या टीम्स 14 सप्टेंबरला दुबईत आमने-सामने असतील. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदा दोन्ही टीम्सचा मैदानात आमना-सामना होणार आहे. या सामन्याला भारतात मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. काही लोक हा सामना रद्द करण्याची मागणी करत आहेत. या मुद्यावर टीम इंडियाच्या कोचने पहिल्यांदा मौन सोडलय. त्यांनी हा विषय भारतीय क्रिकेट नियामंक मंडळावर (BCCI) सोडला आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही टीम्सनी आपला पहिला सामना जिंकलाय. ते आता पुढच्या मॅचची तयारी करतायत.
भारत-पाकिस्तान मॅचवर टीम इंडियाचे फलंदाजी कोच सिंताशु कोटक एक मोठी गोष्ट बोललेत. त्यांनी सांगितलं की, टीम इंडियाच सर्व लक्ष पाकिस्तान विरुद्ध चांगली कामगिरी करण्याकडे आहे. खेळाडू अजून कुठल्या गोष्टीवर लक्ष देत नाहीयत. ते म्हणाले की, “या विषयात BCCI जे सांगेल तेच आम्ही करणार. पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा निर्णय सरकार आणि बीसीसीआयने घेतला आहे. आम्ही इथे फक्त खेळायला आलो आहोत” ‘भारत-पाकिस्तान सामना नेहमी रोमांचक असतो. म्हणून आम्हाला त्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे’ असं सिंताशु कोटक म्हणाले.
त्याचा परिणाम खेळावर सुद्धा झाला
पाकिस्तान विरुद्ध सामन्यावरुन भारतात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाले. त्याचा परिणाम खेळावर सुद्धा झाला. पाकिस्तानी हॉकी टीम आशिया कप खेळण्यासाठी भारतात आली नाही. पण UAE मध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध दुबईत खेळणार आहे.
सामन्याची तिकीट विक्री 50 टक्क्यापेक्षा पण कमी
पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्याच्या मुद्यावरुन सोशल मीडियावर BCCI वर खूप टीका सुरु आहे. भारताच्या टी 20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ समोर आल्यानंर सोशल मीडियावर त्याच्यावर सुद्धा टीका आणि ट्रोलिंग झाली. यात तो पाकिस्तानी कॅप्टन सलमान अलीला हात मिळवत होता. त्यानंतर भारतात पाकिस्तान विरुद्ध विरोधाची धार वाढली आहे. त्याचा आता सामन्यावर परिणाम होत आहे. रिपोर्ट्सनुसार, या सामन्याची तिकीट विक्री 50 टक्क्यापेक्षा पण कमी झाली आहे.
