Asia Cup Final 2025 : अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्याच्या दुखापतीवर टीम इंडियाने सोडलं मौन, दोघे फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणार का?
Asia Cup Final 2025 : हार्दिक पंड्या आणि अभिषेक शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे उद्या पाकिस्तान विरुद्ध ते अंतिम सामना खेळणार की नाही? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

आशिया कप 2025 मध्ये काल सुपर-4 राऊंडच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला. आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये टीम इंडिया अजिंक्य राहिली आहे. आता भारतासमोर फायनलचा शेवटचा अडथळा उरला आहे. पण फायनल आधी टीम इंडियाच्या गोटातून एक टेन्शन वाढवणारी बातमी आली आहे. हार्दिक पंड्या आणि अभिषेक शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे उद्या पाकिस्तान विरुद्ध ते अंतिम सामना खेळणार की नाही? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. आता भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी दोघांच्या दुखापतीवर अपडेट दिली आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये मॉर्केल मीडियाशी बोलले. ते म्हणाले की, अभिषेकमध्ये सुधारणा होतेय. हार्दिकच्या स्थितीच शनिवारी विश्लेषण केलं जाईल. भारताची गोलंदाजी सुरु असताना दोन्ही खेळाडूंना क्रॅम्प आल्याच त्यांनी सांगितलं. त्यामुळे दोघे मैदानाबाहेर गेले.
हार्दिकच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झालीय. श्रीलंकेच्या डावात पहिली ओव्हर टाकल्यानंतर त्याने मैदान सोडलं. हार्दिकने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये कुशल मेंडीसला शुन्यावर बाद केलं. मैदानाबाहेर गेल्यानंतर हार्दिक पुन्हा आला नाही. संपूर्ण सामना भारताला त्याच्याशिवाय खेळावा लागला.
अभिषेक शर्माला कितव्या ओव्हरमध्ये त्रास झाला?
दुसऱ्याबाजूला नवव्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माला त्रास सुरु झाला. धावताना त्याने डावी मांडी पकडल्याच दिसत होतं. 10 व्या ओव्हरमध्ये तो मैदानाबाहेर गेला. श्रीलंकेची इनिंग सुरु असताना दोन्ही खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये दुखणाऱ्या भागला बर्फाचा शेक देण्यात आला तसच क्रॅम्पचा त्रास कमी करण्यासाठी विशेष ज्यूस दिला.
दोघे क्रॅम्पचा सामना करत होते
“सामना सुरु असताना दोघे क्रॅम्पचा सामना करत होते. आज सकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत यावर तोडगा काढू. शनिवारपर्यंत काय तो निर्णय घेऊ. दोघे फक्त क्रॅम्पचा सामना करत होते” असं मॉर्केलने पत्रकारांना सांगितलं. शनिवारी भारतीय खेळाडूंच कुठलही ट्रेनिंग सेशन नसल्याच मॉर्केलने सांगितलं. मॉर्नी मॉर्केल हा दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज आहे. सध्या तो टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. सर्व खेळाडूंना विश्रांती मिळावी अशी संघ व्यवस्थापनाची भूमिका असल्याच मॉर्केल म्हणाला.
