AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 1st ODI | भारत की ऑस्ट्रेलिया, वन डेमधील आकडे काय सांगतात?

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिली एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

India vs Australia 1st ODI | भारत की ऑस्ट्रेलिया, वन डेमधील आकडे काय सांगतात?
| Updated on: Nov 26, 2020 | 4:40 PM
Share

सिडनी : बहुप्रतिक्षित टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India vs Australia 2020) सुरुवात शुक्रवार 27 नोव्हेंबरपासून होत आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका असणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये (Sydney Cricket Ground) खेळण्यात येणार आहे. यानिमित्ताने आपण टीम इंडियाची एकदिवसीय सामन्यात सिडनीत कशी कामगिरी राहिली आहे, याचा आढावा घेणार आहोत. Team India ODI record against Australia at the Sydney Cricket Ground

अशी आहे कामगिरी

टीम इंडियाची सिडनीमधील कामगिरी फारशी चांगली नाही. टीम इंडियाने आतापर्यंत सिडनीमध्ये एकूण 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 20 पैकी 14 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. तर केवळ 5 सामन्यात विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

टीम इंडियाने या 20 एकदिवसीय सामन्यांपैकी 17 सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आहेत. या 17 पैकी 14 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलंय. तर टीम इंडियाला केवळ 2 सामन्यातच विजय मिळवण्यास यश आलंय. उर्वरित 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाने इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानवर प्रत्येकी 1 वेळा विजय मिळवला आहे.

सिडनीतील अखेरच्या सामन्यातही पराभव

यजमान ऑस्ट्रेलियाने मागील दौऱ्यात भारताचा सिडनीत झालेल्या एकदिवसीय सामन्यात 34 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाला 289 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज हिटमॅन रोहित शर्माने 133 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच महेंद्रसिंह धोनीनेही अर्धशतक ठोकलं होतं. मात्र यानंतरही टीम इंडियाला 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं.

दरम्यान टीम इंडिया शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भिडण्यासाठी सज्ज आहे. तसेच टीम इंडियाला या मागील पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. या एकदिवसीय मालिकेत रोहितला दुखापतीमुळे वगळण्यात आलं आहे. तसेच धोनीनेही निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहित आणि धोनीशिवाय टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ : ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ : एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टॉर्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, एकूण 140 वेळा आमनासामना, कोण वरचढ, कोण कमजोर?

‘गब्बर’कडून टीम इंडियाच्या नव्या जर्सीमधील फोटो शेअर, चाहत्यांकडून जुन्या संघाच्या आठवणींना उजाळा

Team India ODI record against Australia at the Sydney Cricket Ground

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.