विश्वचषकापूर्वी धक्का, टीम इंडियाचा हुकमी सलामीवीर दुखापतग्रस्त

मुंबई: एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड काही दिवसात करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा हुकमी सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. आयपीएलमधील सामन्यापूर्वी सरावादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली. दुखापतीमुळे तो उजवा पाय पकडून मैदानाबाहेर गेला. रोहित शर्माची दुखापत जर वेळेत बरी झाली नाही तर वर्ल्डकप 2019 पूर्वी …

विश्वचषकापूर्वी धक्का, टीम इंडियाचा हुकमी सलामीवीर दुखापतग्रस्त

मुंबई: एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड काही दिवसात करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा हुकमी सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. आयपीएलमधील सामन्यापूर्वी सरावादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली. दुखापतीमुळे तो उजवा पाय पकडून मैदानाबाहेर गेला. रोहित शर्माची दुखापत जर वेळेत बरी झाली नाही तर वर्ल्डकप 2019 पूर्वी भारताला हा मोठा धक्का असेल.

रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या संघाचं नेतृत्व करतो. टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघातील तो महत्त्वाचा खेळाडू आहे.

वानखेडे स्टेडियमवर सरावादरम्यान रोहित शर्माचे स्नायू दुखावले. या दुखापतीमुळे रोहित अक्षरश: विव्हळत होता. त्यावेळी मुंबई इंडियन्सचे फिजीओ नितीन पटेल धावत रोहितकडे गेले आणि त्यांनी तातडीने उपचार सुरु केले. रोहित शर्मा स्वत: चालत ड्रेसिंगरुममध्ये गेल्याचं पाहायला मिळाल्याने काहीसा दिलासा आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा आज किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना होत आहे. रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे, त्यावर त्याचं आजचं भवितव्य ठरणार आहे.

ICC World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची 15 एप्रिलला घोषणा  

आयसीसीच्या वन डे विश्वचषकासाठी येत्या 15 एप्रिलला भारतीय संघाची (Indian squad for Cricket World Cup 2019) घोषणा करण्यात येणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाला 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.

संबंधित बातम्या 

ICC World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची 15 एप्रिलला घोषणा  

IPL 2019: ड्वेन ब्रावोच्या हातात बॅट-बॉल सोडून वस्‍तरा-कात्री  

‘या’ ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूचा IPL प्रकरणी विमा कंपनीविरोधात 15.3 लाख डॉलरचा खटला  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *