AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thandai recipe : तुमच्या मुलांनाही धष्टपुष्ट बनवायचंय?, पैलवानांचा जबरी खुराक, थंडाई कशी बनते?

अस्सल थंडाईची रेसिपी (Thandai recipe) जाणून घ्यायची म्हटल्यावर तालमीशिवाय दुसरं कोणतं ठिकाण असू शकेल? म्हणूनच यासाठी आम्ही पोहचलो कोल्हापूरमधील गंगावेश तालमीमध्ये. (Kolhapur Gangavesh Talim)

Thandai recipe : तुमच्या मुलांनाही धष्टपुष्ट बनवायचंय?, पैलवानांचा जबरी खुराक, थंडाई कशी बनते?
पैलवानांचा जबरी खुराक, थंडाई कशी बनते?
| Updated on: Mar 06, 2021 | 11:23 AM
Share

कोल्हापूर : एखाद्या पैलवानाला पाहिलं की (Kolhapur Thandai recipe) आपल्याला प्रश्न पडतो की हा नेमकं काय आणि किती खात असेल. पैलवानांच्या आहारात (Kushti wrestler) दूध,केळी आणि अंड्याना जितकं महत्व आहे. तितकीच किंबहुना त्यापेक्षाही काहीसं जास्त महत्व आहे ते थंडाईला. पैलवानांसाठी संजीवनी असलेली हे थंडाई असते कशी, ती बनवली कशी जाते आणि कशी असते थंडाई (Thandai) बनवण्याची मेहनत, त्याचा हा आढावा –

अस्सल थंडाईची रेसिपी जाणून घ्यायची म्हटल्यावर तालमीशिवाय दुसरं कोणतं ठिकाण असू शकेल? म्हणूनच यासाठी आम्ही पोहचलो कोल्हापूरमधील गंगावेश तालमीमध्ये. (Kolhapur Gangavesh Talim) आम्ही गेलो तेव्हा काही पैलवान तालमीबाहेर रोपवर कसरत करत होते. तर काही जण लाल मातीत सराव करण्यात व्यस्त होते. तालमीच्या बाजूलाच असलेल्या एका खोलीत मात्र तयारी सुरू होती थंडाई बनवण्याची. त्यासाठी साहित्याची जुळवा जुळवा करण्यात पैलवान सुधीर कोळेकर आणि त्यांचे सहकारी व्यस्त होते. खोलीतील एक दोन पेट्यामधून थंडाई करण्यासाठी लागणारं साहित्य त्यांनी जमवलं….आणि सुरू झाली दगडी कुंडी आणि दंडयाच्या साहायाने थंडाई बनवण्याची प्रक्रिया.

थंडाई पिण्याची गोष्ट, मात्र बनवणं खायची गोष्ट नाही

थंडाई पिण्याची गोष्ट असली तरी ती बनवणं खायची गोष्ट नाही. कारण बदाम,खसखस,बडीशेप,गुलाबपाकळी आशा साहित्याचं कुंडीत मिश्रण करावं लागतं. अगदी ताकद पणाला लावून दंडयाने हे मिश्रण एकरूप करताना पैलवानांचा ही अक्षरशः घाम निघतो. आता हे मिश्रण करण्यासाठी मिक्सर वापरले जात असले तरी आज ही कोल्हापूरच्या तालमीमध्ये कुंडी हाच आज ही मिक्सर आहे. 5 – 10 मिनिटं नाही तर एक तास हे मिश्रण तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. ज्यात गरजेनुसार पाणी देखील टाकलं जात होतं.

एक तास मिश्रण एकरूप केल्यानंतर अखेर थंडाई बनवण्याची शेवटची प्रक्रिया सुरू झाली. एकरूप केलेलं हे मिश्रण एका पांढऱ्या कापडात घेत तो पिळून त्याचा शक्य तितका रस काढला गेला. हा रस काढण्याची पारंपरिक पद्धतही अनोखी आहे. इतकी मेहनत घेऊन बनवली जाणाऱ्या या थंडाईचे अनेक फायदे पैलवान सांगतात.

थंडाई बनवण्यासाठी साहित्य

साधारण तीन पैलवान तीन लिटरची थंडाई एकावेळेस संपवात. 120 बदाम,खसखस 1 चमचा धने : 3 चमचे,बडीशेप : 3 चमचे, इलायची : 6 ते 7,गुलाब पाकळी : 20 पाकळ्या,मगज बी : 3 चमचे,साखर आवश्यकते नुसार

असं साहित्य यासाठी वापरावं लागतं. एका बाजूला तालमीत पैलवान सराव करत असतात त्याचवेळी दुसऱ्या बाजूला त्यांचे सहकारीही थंडाई बनवत असतात. कसरत आणि सराव करून आलेला पैलवान आल्या आल्या पहिला आस्वाद घेतो तो या थंडाईचा.

VIDEO : थंडाई नेमकी कशी बनते? पाहा रेसिपी

संबंधित बातम्या 

India vs Engaland 4th Test Day 3 Live | इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात, जॅक क्रॉली आणि डॉम सिबली सलामी जोडी मैदानात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.