5

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी गुरु राहुल द्रविडचा खास मंत्रा, मोठ्या विजयानंतर अजिंक्य रहाणेने गुपित सांगितलं

रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत 2-1 ने विजय मिळवून दिला .

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी गुरु राहुल द्रविडचा खास मंत्रा, मोठ्या विजयानंतर अजिंक्य रहाणेने गुपित सांगितलं
अजिंक्य रहाणे
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 2:37 PM

मुंबई : “आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020o) मोसमानंतर आम्ही दुबईहून थेट ऑस्ट्रेलियाच्या दिशेने निघत होतो. तेव्हा राहुल द्रविडने (Rahul Dravid) मला कॉल केला होता. ताण घेण्याची गरज नाही, पहिल्या कसोटीनंतर तुलाच टीम इंडियाचे नेतृत्व करायचं आहे. तु फार चांगली फलंदाजी करतोय. फक्त फार वेळ नेट्स मध्ये सराव करु नकोस. जी चूक मी केली, त्या चुकीची पुनरावृत्ती तु करु नकोस. बाकी कोणत्याही गोष्टीचा दबाव घेऊ नको. चांगल्या प्रकारे टीम इंडियाचे नेतृत्व कर. खेळाडूंना विश्वासात घे. मालिकेच्या निकालाबाबत फार विचार करु नकोस. निकाल आपोआप येईल”, असा सल्ला टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने (Rahul Dravid)  दिला असल्याचं अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सांगितलं. रहाणे समालोचक हर्षा भोगलेच्या (Harsha Bhogale) एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस रहाणे बोलत होता. (the wall Rahul Dravid give ajinkya Rahane victory mantra before australia tour)

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली पाल्कत्वाच्या रजेमुळे भारतात परतला. यामुळे कसोटी मालिकेतील नेतृत्वाची जबाबदारी रहाणेला मिळाली. पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 0-1 पिछाडीवर पडली होती. तसेच मुख्य खेळाडू हे दुखापतग्रस्त झाले होते. यानंतर रहाणेने आपल्या नेतृत्वात नवख्या खेळाडूंना सोबत घेत जोरदार पुनरागमन करत दुसरा सामना जिंकला. यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. तिसरा सामना बरोबरीत राखण्यास दोन्ही संघांना यश आले. तर चौथ्या आणि शेवटच्या रोमांचक झालेल्या सामन्यात टीम इंडियाने कांगारुंचा 3 विकेट्सने पराभव केला.

कांगारुंचा ब्रिस्बेनवर तब्बल 32 वर्षानंतर पराभव झाला होता. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होते. नवख्या खेळाडूंना सोबत घेत रहाणेने भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला. यामुळे कर्णधार रहाणेला क्रिकेटविश्वातून कौतुक करण्यात आलं. विराटऐवजी रहाणेलाच कर्णधार करा, अशी मागणी करण्यात आली. रहाणेचं भारतात परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं.

इंग्लंडचा भारत दौरा

दरम्यान ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे. 5 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आह. यासाठी दोन्ही संघ चेन्नईमध्ये क्वारंटाईन झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

हाडं खिळखिळी करणारी गोलंदाजी, केवळ 62 चेंडूंपर्यंतच सामना रंगला, घातक खेळपट्टीची कहाणी

India vs England | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत कोहलीला धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची ‘विराट’ संधी

Ajinkya Rahane | चौथ्या कसोटीत कुलदीपऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी का दिली, कॅप्टन रहाणे म्हणतो….

(the wall Rahul Dravid give ajinkya Rahane victory mantra before australia tour)

Non Stop LIVE Update
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल