घरातल्या 9 जणांना कोरोनाची लागण, आई-बहिणीचा 15 दिवसांच्या अंतराने मृत्यू, तडाखेबाज क्रिकेटरची इमोशनल कहाणी!

घरातल्या 9 जणांना कोरोनाची लागण, आई-बहिणीचा 15 दिवसांच्या अंतराने मृत्यू, तडाखेबाज क्रिकेटरची इमोशनल कहाणी!
Veda krishnamurthy

वेदाच्या घरातील एकूण 9 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात तिने आई आणि बहिणीला 15 दिवसांच्या अंतराने गमावलं. (Veda krishnamurthy lost her mother And Sister Due to Covid 19)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jun 03, 2021 | 7:26 AM

मुंबई : भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर (Veda Krushnamurthy) दु:खाचा डोंगर कोसळला. एप्रिल महिन्यात तिच्या आईला कोरोनाने हिरावून नेलं. त्या दुखा:ची आसवं पूर्णपणे पुसलीही गेली नसताना मे महिन्यात तिच्या बहिणीचा कोरोनाने मृत्यू झाला. आई आणि बहिणीच्या अकाली मृत्यूने वेदा कृष्णमुर्ती उन्मळून पडलीय. केवळ 15 दिवसांच्या अंतराने घरातील दोन जीवाभावाची माणसं वेदाला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली. वेदा क्रिकेटर म्हणून धडाकेबाज, निर्भिड आहे पण कुटुंबाबत इमोशनल आहे. आपल्या बॅटिंगने प्रतिस्पर्धी संघाच्या बोलर्सला रडवणाऱ्या वेदाने आज आपलं मन मोकळं करताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. वेदाने तिच्यावर आलेली दुख:द वेळ आणि प्रसंग शेअर केला. (Veda krishnamurthy lost her mother And Sister Due to Covid 19)

घरातल्या 9 जणांना कोरोनाची लागण, आई-बहिणीचा 15 दिवसांच्या अंतराने मृत्यू

वेदाच्या घरातील एकूण 9 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. एक सदस्य बरा होतो ना होतो तोच दुसऱ्या सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे वेदा प्रचंड अस्वस्थ होती. दरम्यानच्या काळात वेदाने पंधरा दिवसांच्या अंतराने आपल्या प्राणप्रिय आईला आणि बहिणीला गमावलं. एका महिन्याच्या आत तिला दोन मोठे हादरे बसले. ती उन्मळून पडली. ESPN क्रिक इन्फोला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्यावर आलेला वाईट प्रसंग सांगितला.

घरातील लोकांसाठी मला धीट व्हावं लागलं

“घरावर वाईट परिस्थिती आल्यानंतर इतर सदस्यांसाठी मला धीट व्हावं लागलं. या दोन आठवड्यांत मी खूप काही शिकले. माझ्या कुटुंबातील मी एकटी होते की मला कोरोना विषाणूची लागण झाली नाही. अशा परिस्थितीत मी त्या वेळी घरातील लोकांना वैद्यकीय सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष देत होते. मग मला प्रकर्षाने जाणीव झाली की मूलभूत सुविधांसाठी इतर किती लोकांना संघर्ष करावा लागतो…”, असं वेदा म्हणाली.

तेव्हा आईला हादरा बसला…!

माझ्या आईलाही कदाचित मृत्यूच्या आदल्या रात्री समजलं की मुलांसह कुटुंबातील बऱ्याच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला माहित नाही परंतु कदाचित त्याचा सर्वाधिक परिणाम तिच्यावर झालेला असावा, असं वेदा म्हणाला.

वेदावर दुखा:चा डोंगर

वेदा कृष्णमुर्तीच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. केवळ 15 दिवसांत वेदाने तिच्या आईला आणि बहिणीला गमावलं. 24 एप्रिल रोजी आपली आई गेल्याचं तिने ट्विट करुन सांगितलं होतं. त्याचवेळी बहीणही कोरोनाने संक्रमित असल्याने तिची तब्येत खराब असल्याचं तिने म्हटलं होतं. त्या ट्विटला 15 दिवस होत नाहीत तोपर्यंतच वेदाला आणखी एक दु:खद बातमी द्यावी लागली. 6 मे रोजी ट्विट करुन आपली बहीण आपल्याला कायमचं सोडून निघून गेल्याचं वेदाने सांगितलं.

(Veda krishnamurthy lost her mother And Sister Due to Covid 19)

हे ही वाचा :

कोहली-रवीला माहितीच नाही, आपण लाईव्ह आहोत; विराट म्हणाला, ‘शुरु से हे लगा देंगे’, शास्त्री म्हणाले, ‘हम्म चलेगा!’

WTC Final : इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट म्हणाला, फायनल खेळणं ही तर आमची भूक!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें