AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘..खरा चॅम्पियन तेव्हाच कळतो!’, सचिन तेंडुलकरचा खास व्हिडीओ ट्वीट करत सर विवियन रिचर्ड्स यांचे गौरवोद्गार

भारतरत्न सचिन तेंडुलकरबाबत वेस्टइंडिजचे महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांनी गौरवोद्गार काढले आहेत. रिचर्ड्स यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत सचिनबद्दल असलेल्या आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त केलं आहे.

Video : '..खरा चॅम्पियन तेव्हाच कळतो!', सचिन तेंडुलकरचा खास व्हिडीओ ट्वीट करत सर विवियन रिचर्ड्स यांचे गौरवोद्गार
| Updated on: Mar 02, 2021 | 10:30 PM
Share

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून जो जगभरात ओळखला जातो, मास्टर ब्लास्टर अशी उपमा ज्याला मिळालेली आहे, क्रिकेटमध्ये शतकांचं शकत ज्याने केलं अशा भारतरत्न सचिन तेंडुलकरबाबत वेस्टइंडिजचे महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांनी गौरवोद्गार काढले आहेत. रिचर्ड्स यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत सचिनबद्दल असलेल्या आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त केलं आहे. Unacademy ने ट्वीट केलेला एक व्हिडीओ रिट्वीट करत रिचर्ड्स यांनी खऱ्या चॅम्पियनचं सार सांगितलं आहे.(Sachin Tendulkar’s special praise from Sir Vivian Richards)

Unacademy ने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये सचिनच्या क्रिकेट करिअरचा खास आढावा घेण्यात आला आहे. सव्वा दोन मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये क्रिकेटसारख्या खेळात सचिनची जादू काय होती? सचिनचा खेळ काय होता? आणि सचिन नावाची जादू काय होती? हे मांडण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. “यशाचा आवाज मोठा असतो, पण परिश्रमाची शांतता जोरात व्यक्त होते. त्यासाठी स्वप्नांना पुन्हा जिवंत करा, मार्ग पुनर्निमित करा. जे लोक हा मार्ग तोडतात ते हार मान्य करतात”, असं या ट्वीटमध्ये म्हणण्यात आलंय.

सर विवियन रिचर्ड्स यांनी हा व्हिडीओ रिट्वीट करत, “काय व्हिडीओ आहे! खऱ्या चॅम्पियन तेव्हाच कळतो जेव्हा तो यशाच्या मार्गावर परत येतो”, असं म्हटलं आहे. रिचर्ड्स यांचं हे वाक्य म्हणजे सचिनबद्दल असणारा त्यांचा आदर आणि प्रेम व्यक्त करणारं आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

Unacademy ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये सचिनची क्रेझ काय होती हे सुरुवातीला पाहायला मिळतं. त्याने मैदानात पाऊल टाकल्यानंतर फक्त सचिन-सचिनच्या आजावानं दुमदुमुन जाणारा आसमंत, सचिनच्या चाहत्यांची उत्कटता, चाहत्यांच्या चेहऱ्यावर सचिनबाबत दिसणारा विश्वास आणि प्रेम सुरुवातीला पाहायला मिळतं. त्यानंतर या व्हिडिओत अचानक शांतता पाहायला मिळते. पुढे सचिन तेंडुलकरची पडलेली विकेट, विविध खेळांडूच्या बाऊन्सरवर त्याला झालेली दुखापत, सचिनची विकेट मिळाल्यानंतर बॉलर्सना होणारा आनंद, विकेट पडल्यानंतर हताश होऊन आकाशाकडे पाहत त्याचं ड्रेसिंग रुमकडे जाणं, त्याच्या चाहत्यांचं निराश होणं दाखवलं आहे.

व्हिडीओच्या दुसऱ्या टप्पाची सुरुवातच अपयश… हे चॅम्पियन्ससाठी एक प्रकारे इंधन असतं अशा वाक्यानं करण्यात आली आहे. पुढे सचिनचा झंझावात, त्यांचे एक-एक शॉट्स, शकत ठोकल्यानंतर त्याचं बॅट उंचावणं आणि चाहत्यांचा गगनाला टेकलेला आनंद दाखवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

फिरकीपटू अश्विन चतुर गोलंदाज, लक्ष्मणने उलगडलं यशाचे रहस्य

On This Day | 116 धावांचा यशस्वी बचाव, जाडेजाच्या फिरकीची धमाल, विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा U 19 वर्ल्ड कप विजय

Sachin Tendulkar’s special praise from Sir Vivian Richards

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.