‘देशातील कोरोनाची स्थिती पाहून हृदय तुटतंय’, विराट-अनुष्काने उचललं मोठं पाऊल!

क्राऊड फंडिंग अँड मेडिकल फंड रेसिंग इन इंडिया अर्थात केट्टोसोबत विराट-अनुष्का जोडी #InThisTogether या मोहिमेद्वारे कोरोनाविरोधी लढ्यासाठी निधी गोळा करणार आहे. (Virat Kohli and Anushka Sharma campaign with Ketto to raise funds for Covid-19 relief)

'देशातील कोरोनाची स्थिती पाहून हृदय तुटतंय', विराट-अनुष्काने उचललं मोठं पाऊल!
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीने कोरोना लढ्यात ताकदीने सहभाग घेतलाय.


मुंबई : संपूर्ण भारत देश कोरोनाशी (India Covid 19) दोन हात करतोय. कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेनात… अशा सगळ्या कठीण प्रसंगी अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करतायत. आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीने कोरोना लढ्यात ताकदीने सहभाग घेतला. या लढ्याअंतर्गत त्यांनी भरघोस निधीही दिला आहे. विराट अनुष्का जोडीने 2 कोटी रुपयांची मदत कोरोनाविरोधी लढ्यासाठी दिली आहे. (Virat Kohli and Anushka Sharma campaign with Ketto to raise funds for Covid-19 relief)

केट्टोसोबत विराट अनुष्का, राबवणार विशेष मोहिम

क्राऊड फंडिंग अँड मेडिकल फंड रेसिंग इन इंडिया अर्थात केट्टोसोबत विराट-अनुष्का जोडी #InThisTogether या मोहिमेद्वारे कोरोनाविरोधी लढ्यासाठी निधी गोळा करणार आहे. सोशल मीडियावरुन एका व्हिडीओद्वारे या जोडीने याबद्दलची माहिती दिली आहे.

विराट अनुष्काची 2 कोटींची मदत

या मोहिमेच्या द्वारे जमा झालेली रक्कम ते कोरोना विरोधी लढ्यासाठी देणार आहेत. हे दोघे फक्त आवाहनच करुन थांबले नाहीत तर त्यांनी भरघोस हाताने मदतीही केलीय. दोन कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा विराट-अनुष्काने केली आहे.

विराट अनुष्का व्हिडीओमधून काय सांगतायत?

भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतो आहे. देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे, तिच्यासमोर काही आव्हानं आहेत. ज्या परिस्थितीतून लोक जात आहे ते पाहून माझं हृदय तुटतंय. त्याचमुळे विराट आणि मी केट्टोबरोबर #InThisTogether या मोहिमेद्वारे मदत निधी गोळा करणार आहे, आणि जमा झालेला निधी कोरोनाविरोधी लढ्यासाठी देणार आहोत, असं विराट-अनुष्काने केलेल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

पठाण बंधूंकडूनही मदतीचा हात, कोरोनाग्रस्तांसाठी मोफत भोजन

राजधानी नवी दिल्लीत कोरोना लाटेचा दुसरा प्रभाव सर्वाधिक जाणवत आहे. दिल्लीत दररोज नव्या कोरोनाग्रस्तांची लक्षणीय भर पडत आहे. त्यामुळे दिल्लीच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. तसंच रुग्णांनाही त्रासाला आणि मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने सांगितलं की, आमची अकादमी दक्षिण दिल्लीतील कोरोनाग्रस्तांसाठी मोफत भोजन देईल.

“कोरोना संसर्गाची दुसरी लाट देशभर सुरु आहे आणि अशा परिस्थितीत गरजूंना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. यापासून प्रेरणा घेऊन क्रिकेट अकादमी ऑफ पठाण (CAP) दक्षिण दिल्लीतील गरजूंना मोफत भोजन पुरवेल”, असं इरफान पठाण याने सांगितलं.

(Virat Kohli and Anushka Sharma campaign with Ketto to raise funds for Covid-19 relief)

हे ही वाचा :

रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ‘प्रेमाचा इजहार’

ICC World Test Championship Final : पृथ्वी शॉला संधी मिळणार की नाही, भारतीय संघाच्या घोषणेची शक्यता

कोरोनाबाधित माईक हसीला एअर अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीहून चेन्नईला हलवलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI