AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-इंग्लंड मालिकेत ‘हा’ खेळाडू सर्वांत जास्त रन्स करणार, इंग्लंडच्या दिग्गजाची आणखी एक भविष्यवाणी!

आगामी भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली सगळ्यात जास्त धावा करेल, असं भाकित मॉन्टी पनेसरने केलं आहे. (Virat kohli Maximum Runs in india vs England test Series Says Monty Panesar)

भारत-इंग्लंड मालिकेत 'हा' खेळाडू सर्वांत जास्त रन्स करणार, इंग्लंडच्या दिग्गजाची आणखी एक भविष्यवाणी!
माँटी पनेसर (इंग्लंडचा माजी फिरकीपटू)
| Updated on: May 29, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड (India Tour of England) दौऱ्यावर जातोय. येत्या 2 जूनला इंग्लंडला रवाना होण्यासाठी भारतीय संघ टेक ऑफ करेल. भारत आणि न्यूझीलंड (India vs Nea Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final 2021) अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान साउथहॅम्प्टन येथे खेळविला जाणार आहे. या सामन्यानंतर भारताला इंग्लंड (India vs England) विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकंदरीतच भारताच्या इंग्लंड दौऱ्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलंय.  अशातच  इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू मॉन्टी पनेसरने (Monty Panesar) आणखी एक भविष्यवाणी केली आहे. (Virat kohli Maximum Runs in india vs England test Series Says Monty Panesar)

आगामी भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली सगळ्यात जास्त धावा करेल, असं भाकित मॉन्टी पनेसरने केलं आहे. याअगोदर भारत इंग्लंडला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 5-0 ने नेस्तनाबूत करेल, अशी भविष्यवाणी म़ॉन्टीने केली होती. त्यानंतर आता इंग्लंड दौऱ्यात विराट सर्वाधिक रन्स करेल, असं मॉन्टीने म्हटलंय.

इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीची बॅट तळपणार

आगामी इंग्लंड दौऱ्यात विराटची बॅट चांगलीच तळपेल असा विश्वास व्यक्त करताना माँन्टीने भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन्स करेल, असं भाकित वर्तवलंय. तो इंडिया टुडेशी बोलत होता. या मुलाखतीत त्याने आगामी भारत इंग्लंड मालिकेविषयी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

भारत इंग्लंडला 5-0 ने आस्मान दाखवेल, माँन्टीची पहिली भविष्यवाणी

“भारतीय संघ अतिशय योग्य वेळी इंग्लंडचा दौरा करत आहे. कारण भारतीय संघातले सगळेच खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधील वातावरणात गरमी असेल. याचाच फायदा भारतीय संघ घेऊ शकतो. संघात दोन फिरकीपटूंना संधी देऊन इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 म्हणजेच क्लिन स्वीप देण्याची धमक भारतीय संघात आहे, अशी भविष्यवाणी माँन्टी पनेसरने केली प्रथमत: केली होती.

…तर विदेशातला सगळ्यात मोठा विजय

“भारतीय संघातील खेळाडू दमदार आहेत तसंच तुफान फॉर्मात देखील आहेत. त्यामुळे इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 असं हरवून भारत क्लिन स्वीप देऊ शकतो, तशी ताकद भारतीय संघात आहे. जर भारतीय संघाने अशी कामगिरी केली तर विदेशात भारतासाठी हा सगळ्यात मोठा विजय असेल”, असंही माँटी म्हणाला होता.

(Virat kohli Maximum Runs in india vs England test Series Says Monty Panesar)

हे ही वाचा :

KKR चा फलंदाज राहुल त्रिपाठीवर पुणे पोलिसांची कारवाई, दंडही ठोठावला!

भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

‘बाहुबली रिषभ पंत’, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसोबत काय करतोय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.