वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज मार्लोन सॅम्युअल्सचा क्रिकेटला अलविदा, निवृत्तीची घोषणा
वेस्ट इंडिजचा धुरंधर बॅट्समन मार्लोन सॅम्युअल्सने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजचा (West Indies) तडाखेबंद बॅट्समन मार्लोन सॅम्युअल्सने (Marlon Samuels) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 39 वर्षीय सॅम्युअल्सने निवृत्तीची घोषणा करण्याआधी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला कळवलं होतं. सॅम्युअल्सने आपल्या क्रिकेट करिअरमधील शेवटची मॅच 2018 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळली होती. (West Indies marlon Samuels Announed retirement professional Cricket)
सॅम्युअल्स आपल्या तुफानी बॅटिंगसाठी प्रसिद्ध होता. भल्याभल्या बॉलरला आपल्या बॅटींगच्या तालावर नाचावण्यात तो माहिर होता. वेस्ट इंडिजने जिंकलेल्या दोन्ही टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये त्याने सिंहाचा वाटा उचलला होता. संघाला जेव्हाही गरज असेल तेव्हा त्याची बॅट नेहमी तळपायची.
सॅम्युअल्सने 2012 साली झालेल्या टी-ट्वेन्टी (T-20 World Cup) फायनल मॅचमध्ये झंझावाती खेळी उभारत क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. श्रीलंकेविरुद्ध 56 बॉलमध्ये 78 रन्सची धमाकेदार इनिंग खेळत तसंच बॉलिंगमध्येही 4 ओव्हरमध्ये 15 रन्स देऊन एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवत संघाच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला होता.
2016 साली झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 66 बॉलमध्ये नाबाद 85 रन्स त्याने केल्या होत्या. त्याच्या याच खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंडला पाणी पाजून दुसऱ्यांदा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप विजेते होण्याचा मान मिळवला होता. याच मॅचमध्ये त्याला ‘मैन ऑफ द मॅच’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
सॅम्युअल्सने आपल्या करिअरमध्ये टी-ट्वेन्टी मॅचमध्ये देखील प्रतिनिधित्व केले. आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स आणि पुणे वॉरियर्सचं नेतृत्व सॅम्युअल्सने केलं होतं. बिग बॅश लिगमध्येही मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना त्याने काही धमाकेदार इनिंग खेळल्या.
सॅम्युअल्सचं क्रिकेट करिअर
सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजकडून 71 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 67 टी-ट्वेन्टी सामने खेळले. तिन्ही फॉर्मटमध्ये सॅम्सुअल्सच्या नावावर 17 शतकांच्या साहाय्याने 11 हजार 334 रन्स आहेत. तसंच बॉलिंगमध्ये आपला करिश्मा दाखवताना 152 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
(West Indies marlon Samuels Announed retirement professional Cricket)
संबंधित बातम्या
Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा
Irfan Pathan Retire : इरफान पठाणचा क्रिकेटला अलविदा, निवृत्तीची घोषणा
