सचिन तेंडुलकर रस्ता चुकला, रिक्षावाला म्हणाला, ‘फॉलो मी’; व्हिडीओ व्हायरल

सध्या याठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने एकच लेन सुरु आहे. त्यामुळे मी रस्ता चुकलो आहे. | Sachin Tendulkar

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:57 PM, 25 Nov 2020
When lost Sachin Tendulkar was helped by an auto rickshaw driver in Mumbai

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर व्हिडीओज शेअर करत असतो. त्याने नुकताच फेसबुक अकाऊंटवरून आणखी एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ जानेवारी महिन्यातील आहे. (Sachin Tendulkar helped by auto dirver as he lost his way in Mumbai Kandiwali)

सचिन तेंडुलकर मुंबईत कारने प्रवास करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. त्यावेळी कांदिवली पूर्व परिसरात सचिन रस्ता चुकला. तेव्हा एक रिक्षावाला सचिनच्या मदतीला धावून आला. त्याने आपली रिक्षा सचिनच्या गाडीच्या पुढे ठेवत त्याला मुख्य रस्त्यावर आणून सोडले.

सचिनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याला अनेकांची पसंती मिळत आहे. सचिनच्या गाडीतच हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. मी कांदिवलीत आहे. सध्या याठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने एकच लेन सुरु आहे. त्यामुळे मी रस्ता चुकलो आहे. मात्र, एक रिक्षावाला आता माझ्या मदतीला आला. तो मला म्हटला की, मला फॉलो करा, मी तुम्हाला हायवेपर्यंत सोडतो. आता माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही. हा रिक्षावालाच माझी मदत करु शकतो, असे सचिन व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

या रिक्षाचालकाने हायवेपर्यंत आणून सोडण्यापूर्वी सचिन तेंडुलकरने त्याची विचारपूस केली. या रिक्षाचालकाचे नाव मंगेश फडतरे असे होते. माझा मुलगा तुमचा चाहता असल्याचे त्याने सांगितले. यावेळी सचिनने या रिक्षाचालकासोबत फोटोही काढला. हा रिक्षाचालक नसता तर मी हायवेपर्यंत पोहोचू शकलो नसतो, असे सचिनने व्हिडीओत म्हटले आहे.

अलीकडच्या काळात तंत्रज्ञान आपल्या मदतीला असते. पण माणसाच्या मदतीची कशाशीही तुलना होऊ शकत नाही, असेही सचिन तेंडुलकरने सांगितले.

संबंधित बातम्या:

भारतीय संघात निवड न झाल्यामुळे निराश झालेल्या सूर्यकुमारला सचिन तेंडुलकरच्या खास मेसेजमुळे प्रोत्साहन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 10 वर्षांपासून प्रतिसाद नाही!, मुंबई महापालिकेने नागरी सत्कार गुंडाळला

IPL मधील खतरनाक थ्रो पाहून क्रिकेटचा देवही घाबरला, ICC ला सचिन तेंडुलकरचं खास अपील

(Sachin Tendulkar helped by auto dirver as he lost his way in Mumbai Kandiwali)