India vs Oman Asia Cup 2025 : अभिषेक शर्मा-हार्दिकला एकाच ओव्हरमध्ये आऊट करणारा जितेन रामानंदी कोण आहे? पंड्याशी त्याचं काय नातं आहे?
India vs Oman : आशिया कप टुर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर ओमानचा वेगवान गोलंदाज जितेन रामानंदी चर्चेत आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्याला आऊट केलं. या खेळाडूच भारताशी, हार्दिक पंड्याशी खास कनेक्शन आहे. त्याच्याबद्दल जाणून घ्या.

India vs Oman : ओमान विरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने वेगवान खेळी केली. त्याने अवघ्या 15 चेंडूत 38 धावा फटकावल्या. पण ओमानचा डावखुरा वेगवान गोलंदाज जितेन रामानंदीने त्याला आऊट केलं. जितेन रामानंदीने फक्त अभिषेकलाच नाही, तर हार्दिक पंड्याचा विकेट सुद्धा काढला. जितेन रामानंदीने पंड्याचा विकेट रनआऊटच्या स्वरुपात काढला. फक्त 3 चेंडूत त्याने भारताच्या 2 मोठ्या सिक्स हिटर्सना आऊट केलं. जितेन रामानंदीच भारताच्या हार्दिक पंड्यासोबत खास नातं आहे. या खेळाडूबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.
जितेन रामानंदीचा जन्म गुजरातमध्ये झालाय.बडोद्यामध्ये असताना हार्दिक पंड्यासोबत क्रिकेट खेळला आहे. जितेन रामानंदी गुजरातच्या इंटर क्लब टूर्नामेंटमध्ये हार्दिक पंड्यासोबत मॅच खेळला आहे. हा खेळाडू भारतात करिअर बनवू शकला नाही. त्यानंतर तो ओमानला निघून गेला. आता त्याने आपल्याच देशाविरोधात चांगली कामगिरी केली.जितेन रामानंदीने ज्या पद्धतीने अभिषेक शर्माला आऊट केलं, ते कमाल आहे. कारण अभिषेकला ज्या चेंडूवर बाद केलं, तो चेंडू खूप वेगात आलेला. जितेन रामानंदीला ज्या चेंडूवर यश मिळालं, त्याचा स्पीड 142 किमी प्रति तास होता.
हार्दिकला असं केलं आऊट
जितेन रामानंदीने हार्दिक पंड्याला एकदम वेगळ्या पद्धतीने आऊट केलं,त्याच्या चेंडूवर संजू सॅमसन स्ट्रेट ड्राइव्ह खेळला. त्यावेळी चेंडू रामानंदीच्या बोटाला लागून स्टम्पला लागला.हार्दिक पंड्या त्यावेळी क्रीजच्या बाहेर होता. त्यामुळे रनआऊट होऊन त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
जितेन रामानंदीचा करिअर ग्राफ
जितेन रामानंदीने यावर्षी वनडे आणि टी20 मध्ये डेब्यू केला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने अमेरिकेविरुद्ध डेब्यू केला होता. वनडे डेब्यू सुद्धा त्याने अमेरिकेविरुद्धच केला होता. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने अमेरिकेविरुद्ध T20 डेब्यु केला होता. वनडेमध्येही त्याने अमेरिकेविरुद्धच डेब्यू केलेला. जितेनने आतापर्यंत 4 सामन्यात 3 टी20 विकेट काढले आहेत. त्याचा इकॉनमी रेट 7.17 चा आहे. अबुधाबातील शेख झायेद स्टेडियममध्ये ओमनला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. ओमानने या धावांचा पाठलाग करताना जोरदार झुंज दिली. पण 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 167 धावाच करता आल्या.
