AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs MI, IPL 2021 Match Prediction | मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने, पंतसेना गत मोसमातील अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा घेणार?

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 13 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात लढत रंगणार आहे.

DC vs MI, IPL 2021 Match Prediction | मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने, पंतसेना गत मोसमातील अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा घेणार?
आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 13 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात लढत रंगणार आहे.
| Updated on: Apr 20, 2021 | 4:43 PM
Share

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 13 वा सामना आज दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. गेल्या 13 व्या मोसमात मुंबईने अंतिम सामन्यात दिल्लीवर मात करत जेतेपद पटकावलं होतं. या मोसमात उभयसंघ पहिल्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. त्यामुळे मागील पराभवाचा वचपा घेण्याच्या उद्देशाने दिल्ली मैदानात उतरेल. तर मुंबई विजयी घोडदौड कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. (who will win dc vs mi ipl 2021 today match delhi capitals vs mumbai indians prediction previous match stats in marathi)

आकडेवारी कोणाच्या बाजूने?

आयपीएलच्या इतिहासात उभयसंघ एकूण 28 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबई वरचढ राहिली आहे. मुंबईने 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 12 वेळा मुंबईचा पराभव केला आहे. गत मोसमात या दोन्ही संघांचा एकूण 4 वेळा आमनासामना झाला. यामध्ये मुंबईने दिल्लीवर मात केली. या 4 पैकी 2 सामने हे साखळी फेरीतील होते. तर उर्वरित 2 सामन्यांमध्ये हे क्वालिफायर आणि फायनल मॅचचा समावेश होता.

14 व्या हंगामातील कामगिरी

दोन्ही संघांनी आतापर्यंत या 14 व्या मोसमात एकूण 3 सामने खेळले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. तर 1 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या सामन्यात नक्की कोणता संघ वरचढ ठरतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

अश्विन आणि धवन दिल्लीची ताकद

या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन आणि फिरकीपटू आर अश्विनवर सर्वांचंच लक्ष असणार आहे. अश्विनने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात अफलातून गोलंदाजी केली होती. अश्विनसोबत कगिसो रबाडा आणि ख्रिस वोक्ससारखे तगडे गोलंदाज दिल्लीच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे मुंबईसमोर या तिकडीचं आव्हान असणार आहे. तसेच शिखर धवनही चांगली फलंदाजी करतोय. धवनने पंजाब विरुद्ध 92 धावांची खेळी करत ऑरेन्ज कॅप पटकावली होती. तसेच रिषभ पंतसारखा आक्रमक फलंदाजही दिल्लीकडे आहे.

मुंबईचा तगडा संघ

मुंबईच्या गोटात एकसेएक तोडीसतोड खेळाडू आहेत. मुंबईच्या संघात एकहाती सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आहे. तसेच हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉकसारखे आक्रमक आणि स्टार फलंदाज आहेत. तसेच जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्टसारखे धमाकेदार गोलंदाज आहेत. तसेच फिरकीपटू राहुल चहरपण शानदार कामगिरी करत आहे. यामुळे मुंबई दिल्लीला पराभूत करत विजयाची हॅटट्रिक साकारणार की दिल्ली विजय मिळवणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.

मुंबई इंडियन्सची टीम

रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, आदित्‍य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेन्ट बोल्‍ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, ख्रिस लिन, राहुल चाहर, हार्दिक पांड्या, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, अनुकूल रॉय, इशान किशन, अॅडम मिल्न, नॅथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, युद्धवीर चरक, मार्को जॅनसन, अर्जुन तेंडुलकर आणि जेम्स निशाम.

दिल्ली कॅपिट्ल्सची टीम

रिषभ पंत, खगिसो रबाडा, मार्कस स्‍टोइनिस, इशांत शर्मा, अजिंक्‍य रहाणे, ख्रिस वोक्‍स, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, प्रवीण दुबे, प्रथ्‍वी शॉ, ललित यादव, एनरिक नॉर्किया, आवेश खान, अक्षर पटेल, अमित मिश्रा, टॉम करन, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरिवाला, एम सिद्धार्थ आणि सॅम बिलिंग्स.

संबंधित बातम्या :

IPL 2021 DC vs MI Head to Head | गत मोसमात मुंबई इंडियन्सकडून 4 वेळा पराभव, दिल्ली पंतच्या नेतृत्वात कमाल करणार?

IPL 2021: कॅप्टन कुलचा कारनामा, रोहित-विराटला पछाडत केला ‘हा’ पराक्रम

(who will win dc vs mi ipl 2021 today match delhi capitals vs mumbai indians prediction previous match stats in marathi)

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.