VIDEO: टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा 'DSP' रस्त्यावर, काही वेळातच शहर लॉकडाऊन

भारताला 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकून देणारा क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरले आहेत (World Cup Hero on LockDown duty).

VIDEO: टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा 'DSP' रस्त्यावर, काही वेळातच शहर लॉकडाऊन

मुंबई : भारताला 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकून देणारा क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरले आहेत (World Cup Hero on LockDown duty). जोगिंदर शर्मा हरियाणा पोलिस विभागात पोलिस उपअधीक्षक आहेत. सध्या ते हिसार शहरात आहेत. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचं गांभीर्य लक्षात घेऊन थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. तसेच लोकांना घरातच थांबण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तसेच जोगिंदर शर्मा खऱ्या जगातला हिरोही संबोधण्यात येत आहे.

देशभरात सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं. यानंतर जोगिंदर शर्मा यांनी स्वतः रस्त्यावर उतरुन लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला. यावेळी त्यांनी एकिकडे नागरिकांना घरातच थांबण्याचं आवाहन केलं, तर दुसरीकडे आपल्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनाही निर्देश दिले.


क्रिकेटवरील हा हिरो रस्त्यावरही तितक्याच खिलाडूवृत्तीने उतरल्यानंतर आयसीसीने जोगिंदर यांच्या फोटोंचा एक कोलाज आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. यात लिहिलं आहे, ”2007 : टी-20 वर्ल्ड कपचा हिरो. 2020 : जगातील खरा हिरो. भारताचे जोगिंदर शर्मा आपल्या क्रिकटमधील करिअरनंतर एक पोलिस अधिकारीच्या रुपात जागतिक आरोग्याच्या संकटात आपलं काम करत आहेत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Jogi Sharma 23 Oct (@jogi23sharma) on


जोगिंदर शर्मा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोरोना संसर्गाबाबत आवाहन करणारा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. यात ते म्हणतात, “नमस्कार मित्रांनो मी तुमचा जोगिंदर शर्मा. संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संसर्गाने व्यापलं जात आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला हिच विनंती करेल की तुम्ही सरकारने दिलेल्या सुचनांप्रमाणे वागावं. त्या नियमांचं पालन करावं. जिथं जास्त गर्दी जमा होते तेथे जाऊ नका. सामाजिक कामही सध्या टाळा. कोरोनाला घाबरु नका. कोरोनासोबत आपण लढुया. आपण सर्व मिळून एकमेकांना मदत करु. यातली सर्वात मोठी मदत आपण आपल्या घरी थांबणे हीच आहे. लहान मुलांना समजाऊन सांगा. जितका जास्त वेळ घरात घालवता येईल तो घालवा. पुढील एक आठवडा ते 10 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कोरोना एकमेकांच्या संपर्कात आल्याने जास्त पसरत आहे. त्यामुळे याला घाबरु नका, आपल्याला याच्याशी लढायचं आहे.”

संबंधित बातम्या :

राजनेही मला फोन करुन सूचना दिल्या, त्याबद्दल धन्यवाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘लॉकडाऊनचे काटेकोर पालन करा, अन्यथा…’ तुकाराम मुंढे यांचा इशारा

‘शिवभोजन थाळी’ पुढील तीन महिने अवघ्या 5 रुपयात, भुजबळांची घोषणा

World Cup Hero on LockDown duty in Hariyana

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *