युवा खेळाडू तयार, सिनियरच्या निवृत्तीचा काहीही फरक पडणार नाही; मोहम्मद शमीचं रोखठोक मत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India Vs Australi) जेव्हा सिनियर्स खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळण्याची वेळ आली तेव्हा अनेक युवा खेळाडूंनी पदार्पणात धडाकेबाज कामगिरी केली. | Mohammad Shami

युवा खेळाडू तयार, सिनियरच्या निवृत्तीचा काहीही फरक पडणार नाही; मोहम्मद शमीचं रोखठोक मत
Bumrah, Shami And Ishant

मुंबई : गेल्या काही दिवसांत भारताच्या युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केलंय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India Vs Australi) जेव्हा सिनियर्स खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळण्याची वेळ आली तेव्हा अनेक युवा खेळाडूंनी पदार्पणात धडाकेबाज कामगिरी केली. मग वाटतं की आगामी काळात ज्यावेळीही अनुभवी खेळाडूंची रिटायरमेंटची वेळ आली येईल. तेव्हा भारतीय क्रिकेट संघाला जास्त फरक पडणार नाही कारण त्यांची जागा घ्यायला भारतीय युवा गोलंदाज सक्षम आहेत आणि हा बदलही अगदी व्यवस्थित होईल, असं मत भारताचा विकेट टेकर गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) व्यक्त केलं आहे. (Young Bowler Will Make Smooth Transition Indian team Mohammad Shami)

जागतिक क्रिकेटमध्ये पाठीमागच्या 4 ते 5 महिन्यांपासून सगळ्यात जास्त चर्चा आहे ती भारतीय युवा खेळाडूंचं पदार्पण आणि त्यांच्या कामगिरीबद्दल… ऑस्ट्रेलियापासून सुरु झालेला प्रवास इंग्लंडच्या विजयापर्यंत येऊन थांबला. डिसेंबर ते मार्च यादरम्यान भारताच्या युवा खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला. त्यांच्या दमदार खेळाच्या जोरावर भारताने इंग्लंडला तिन्ही फॉरमॅटमध्ये पाणी पाजलं. अशी कामगिरी भारतीय खेळाडूंनी टीम मजबूत आहे एवढंच दाखवलं नाही तर एक नवा बेंचमार्क सेट केला.

आमच्या निवृत्तीनंतर बदलाची समीकरणं सोपी

मोहम्मद सिराज, शुभमन गिल, नवदीप सैनी, टी नटराजन, वॉशिग्टंन सुंदर, शार्दुल ठाकूर या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांनीही चमकदार कामगिरी केली. मोहम्मद शमी म्हणाला, ज्यावेळी आमची निवृत्ती घेण्याची वेळ असेल तेव्हा भारतीय युवा खेळाडू आमची जागा घेण्यात तयार असेल. मला वाटतं की जेव्हा आम्ही क्रिकेटमधून संन्यास घेऊ, तेव्हा बदलाची समीकरणं सोपी असतील.

येणारा काळ युवा खेळाडूंचा असेल

खेळाडूंना अनुभव नेहमीच महत्त्वाचा असतो. सध्याचे युवा खेळाडू चांगल्या कामगिरीबरोबरच अनुभवही घेतायत. त्यामुळे येत्या काळात एखाद्या सिनियर खेळाडूने जरी निवृत्तीची घेतली तरी भारतीय युवा खेळाडू त्याची उणीव भासू देणार नाही. ते आपल्या खेळीने त्याची कमतरता भासेल, अशी कामगिरी करणार नाहीत. उलट त्याच्याही पुढे जाऊन ते चांगली खेळी करुन सातत्याने संघाला विजय कसा मिळेल, याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर येणारा काळ युवा खेळाडूंचा असेल, असं शमी म्हणाला.

(Young Bowler Will Make Smooth Transition Indian team Mohammad Shami)

हे ही वाचा :

केवळ दिल्लीचं नाही तर येणाऱ्या काळात रिषभ पंत भारताचं नेतृत्व करेन; या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

एकदिवसीय मालिकांचा हुकमी एक्का ! विराट कोहली ICC ODI रँकिंगमध्ये पहिला

Video : शिखर धवनने यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्रीसोबत केला भांगडा, व्हिडीओ व्हायरल

Published On - 7:16 am, Thu, 1 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI